अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम
रस्त्यावरील ओसंडून वाहणारे कचऱ्याचे डबे, त्या डब्याच्याभोवती असलेले घाणीचे साम्राज्य यामुळे रोगराई पसरते. सर्वसामान्यांच्या जीवनावर याचा फरक पडतोच पण प्रदुषणही तितकचं होत. यामुळेच हे चित्र बदलण्यासाठी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी बेळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या हेतूने नवे पाऊल उचलले आहेत. बेळगावमध्ये सध्या जमीनीखाली कचऱ्याचा डबा बसवण्यात येणार आहेत.
या डब्याचे वैशिष्ट्य काय?
- बेळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या हेतून अभय पाटील यांनी अंडरग्राऊंड हायड्रोलिक डस्टबिन आणि हायड्रोलिक डस्टबिन उचलण्यासाठी फोर्टीन कम कॉम्पॅक्टर विथ ग्रेन अशा प्रकारे दोन कोटींचा प्रोजेक्ट हाती घेतला आहे.
- पहिल्या टप्प्यात प्रत्येक वॉर्डमध्ये एक अंडरग्राऊंड डस्टबिन निर्माण करण्यात येणार आहे.
- आणि यापुढे दुसऱ्या टप्प्यात आणखी एक एक डस्टबिन प्रत्येक वॉर्डमध्ये निर्माण करण्यात येणार आहे.
- या अंडरग्राऊंड डस्टबिनची क्षमता एक टन कॅपॅसिटीची आहे.
- ७५ टक्के कचरा साचल्यानंतर त्या वॉर्डच्या स्वच्छता कर्मचाऱ्याला एक मेसेज जाईल.
- नव्वद टक्के कचरा भरल्यावर जर तिथून तो कचरा उचलला गेला नाही तर त्या वॉर्डच्या नगरसेवकाला व कॉर्पोरेशन कमिशनरला मेसेज जाईल.
- डस्टबिन शंभर टक्के भरल्यावर जर तिथून कचरा उचलला गेला नाही तर संबंधित कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
बेळगाव शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असल्याने रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून शहर स्वच्छ ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेतच, त्यात या अंडरग्राऊंड डस्टबिन बसवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या आगळ्या-वेगळ्या आधुनिक पद्धतीचा सेन्सर असलेला डस्टबिन बेळगावमध्ये येत्या पंधरा दिवसात बसवण्यात येणार आहे. आणि याची सुरुवात शाहपूरमध्ये होणार आहे. हा उपक्रम कर्नाटकातच नाही तर भारतातला पहिला उपक्रम असेल.