Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

महात्मा गांधी नरेगा योजनेच्या ‘उन्नती’ प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील ६ प्रशिक्षित उमेदवार सन्मानित

March 26, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Unnati Project

मुक्तपीठ टीम

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ‘उन्नती’ प्रकल्पांतर्गत प्रशिक्ष‍ित होऊन स्वयंरोजगार सुरू करणाऱ्या महाराष्ट्रातील ६ प्रशिक्ष‍ित उमदेवारांना दिल्लीत सन्मानित करण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत येणाऱ्या ‘उन्नती’ या प्रकल्पांतर्गत प्रशिक्ष‍ित होऊन स्वयंरोजगार करणाऱ्या देशभरातील एकूण ७५ उमेदवारांचा आज सन्मान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील ६ उमेदवारांचा समावेश आहे.

 

येथील डॉ.आंबेडकर आंतरराष्ट्रीय सभागृहामध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या ‘उन्नती’ प्रकल्पांतर्गत प्रशिक्ष‍ित होऊन स्वयंरोजगार सुरू करणाऱ्या ७५ उमेदवारांना सन्मानित करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

या कार्यक्रमात केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरिराज सिंह, ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती, फग्गन सिंह कुलस्ते आणि पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह सचिव (ग्रामीण विकास) नागेंद्र नाथ सिन्हा आणि संयुक्त सचिव (महात्मा गांधी नरेगा) रोहित कुमार उपस्थित होते.

 

आज झालेल्या कार्यक्रमात उन्नतीच्या माध्यमातून प्रशिक्षित उमेदवारांनी आपले मनोगत मंचावरून मांडलेत. त्यांच्या आयुष्यात या घेतलेल्या प्रशिक्षणातून झालेला बदल अतिशय सकारात्मक असा आहे.

 

उन्नती प्रकल्पाविषयी

उन्नती प्रकल्प हा कौशल्यावर आधारीत प्रशिक्षण देणारा प्रकल्प आहे. याअंतर्गत महात्मा गांधी नरेगा लाभार्थींना आरसेटी (ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण) च्या माध्यमातून कौशल्य आधारीत प्रशिक्षण देऊन ज्ञान आणि आजीविकेमध्ये वाढ व्हावी असे प्रयत्न करते. यामुळे आंशिक रोजगारामधून पूर्णकालीन रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केला जातो.

 

केंद्र शासनाच्या ‘उन्नती’ प्रकल्पांतर्गत, आरसेटीच्या माध्यमातून (ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण) प्रशिक्ष‍ित होऊन आर्थिकरित्या सक्षमपणे आपली आणि आपल्या कुटुंबीयांची जबाबदारी पार पाडीत असल्याच्या भावना हिंगोली जिल्ह्यातील चिचोली येथील वंदना भगत यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या पतीचे निधन झाले असून दोन मुलं आहेत. त्यांनी शेळीपालनाचे प्रशिक्षण घेतले आणि यातूनच संपूर्ण कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याचे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. आज दिल्लीत येऊन पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्यासह अन्य ५ प्रशिक्ष‍ित उमदेवारांना सन्मानित करण्यात आले. उन्नती अंतर्गत आतापर्यंत एकूण १८ हजार १६६ उमेदवारांना प्रशिक्षित केले आहे. महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत ज्यांनी एका वर्षामागे १०० दिवस रोजगार पूर्ण केले असेल अशा कुटुंबांतील एका प्रौढ (१८ ते ४५ वयोगटातील) व्यक्तीला प्रशिक्षण दिले जाते.

 

महाराष्ट्रातील ५ प्रशिक्ष‍ित उमेदवारांविषयी

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पंचायत समितीच्या लाभार्थी मनीषा बोचरे या जिजामाता महिला बचत गटाच्या आहेत. त्यांनी शेळीपालनाचे प्रशिक्षण आरसेटी (ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण )च्या माध्यमातून घेतले. त्यांच्याकडे एक बोकड आणि १० शेळी आहेत. यापासून चांगला कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. आज मिळालेल्या पुरस्काराबद्दल खूप आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

 

परभणी जिल्ह्यातील पुर्णा येथील मुंजाजी शिवणकर हे मनरेगामध्ये मजूर म्हणून काम करतात. मजुरीतील रकमेतून काटकसर करून म्हैस विकत घेतली. आरसेटीमधून म्हशीच्या शेणापासून गांडूळ खत बनविण्याचे प्रशिक्षिण घेतले. त्याचा त्यांना लाभ होतो आहे. दररोजचे २००० ते २५००  रूपये म्हशींच्या दूधापासून उत्पन्न मिळते. संपूर्ण कुटुंबाचे पालनपोषण चांगल्यारीतीने होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील दिनेश गावंडे यांनाही आज पुरस्कार मिळाला. त्यांनी गुलाबराव बचत गट सुरू करून यामाध्यमातून ते रोपवाटिका चालवितात. यांनी आरसेटीमधून रोपवाटिकेचे प्रशिक्षण घेतले. रोपवाटिकेमध्ये फळ झाडे, फुल झाडांच्या १५० कलमा उपलब्‍ध असल्याचे त्यांनी सांगितले. सुरूवातीला २ गुंठे जमीन होती. आता २ एकरामध्ये रोपवाटिका असल्याचे सांगितले, या सर्व प्रवासात शासनाकडून मिळालेल्या मदतीबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले.

 

ओंकार जाधव हा तरूण मुलगा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. त्यांचा पिढीजात दुग्ध व्यवसाय आहे. त्यात फारसा काही आर्थिक फायदा होत नसल्याचे दिसल्यावर त्यांनी आरसेटीकडून प्रशिक्षण घेतले. यामुळे वैरणाचा पुरेपूर वापर होऊ लागला आणि उत्पन्नात भरघोस वाढ झाल्याचे सांगितले. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील अंबादास मेरगल यांनाही उन्नतीअंतर्गत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार होते परंतु ते आज उपस्थित नव्हते.

 

आजच्या पुरस्कार सोहळयासाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र अहिरे, पुण्याचे विस्तार अधिकारी किरण मोरे, सहायक राज्य एमआयएस रविंद्र भुते, सहायक कार्यक्रम अधिकारी सतीश घोडके व लाभार्थी उपस्थित होते.

 


Tags: good newsMaharashtraMahatma Gandhi NREGA SchememuktpeethTrained CandidatesUnnati Projectउन्नती प्रकल्पचांगली बातमीप्रशिक्षित उमेदवारमहात्मा गांधी नरेगा योजनामहाराष्ट्रमुक्तपीठ
Previous Post

आता गॅस सिलिंडरचं पेमेंट करा फक्त आवाजाने!

Next Post

निराधार व्यक्तींना निवृत्तीवेतन योजनेचा लाभ; उत्पन्न मर्यादा वाढविण्यावर सरकार विचार करणार!

Next Post
govt to increase limit of pension scheme

निराधार व्यक्तींना निवृत्तीवेतन योजनेचा लाभ; उत्पन्न मर्यादा वाढविण्यावर सरकार विचार करणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!