मुक्तपीठ टीम
देश-विदेशातील अनेक बड्या कंपन्या तसेच भारतातील अनेक छोट्या कंपन्या आणि स्टार्टअप्स नवीन आणि सर्वोत्तम इलेक्ट्रिक वाहने सादर करत आहेत. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता आणि मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळे आता या यादीत नव्या नावाची भर पडणार आहे ते म्हणजे Ultraviolette Automotive Private Limited, ही एक बंगळुरूस्थित ऑटोमोबाईल कंपनी आहे. कंपनी २४ नोव्हेंबर रोजी नवीन इलेक्ट्रिक स्पोर्ट्स मोटरसायकल मेड इन इंडिया अल्ट्राव्हायोलेट F77 लाँच करणार आहे. कंपनी गेली ५ वर्षे यावर काम करत आहे.
उत्कृष्ट डिझाइनसह उत्कृष्ट फिचर्स…
- अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडच्या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स मोटरसायकलला स्पोर्टी लुक देण्यात आला आहे.
- यात मोबाइल अॅप कनेक्टिव्हिटी, F77 रिमोट डायग्नोस्टिक्स, ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट्स, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, मल्टिपल राइड मोड्स, बाइक ट्रॅकिंग, राइड डायग्नोस्टिक्स, स्मार्ट आणि कनेक्टेड बाइक तंत्रज्ञान आहे.
- या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स मोटरसायकलमध्ये २५ किलो वॉटचा बॅटरी पॅक वापरला आहे.
- हा बॅटरी पॅक ३३.५ होर्स पॉवर आणि ९० एनएम टॉर्क जनरेट करेल.
- ही इलेक्ट्रिक मोटरसायकल ०-६० किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी फक्त २.९ सेकंद घेईल आणि तिचा टॉप स्पीड १४० किमी प्रतितास आहे.
- ही इलेक्ट्रिक मोटरसायकल एका सिंगल चार्जिंगमध्ये ३०७ किमीची राइडिंग रेंज आहे.
अल्ट्राव्हायोलेट F77 पूर्णपणे ‘मेड इन इंडिया मोटरसायकल!
- कंपनीने नुकतेच या मोटरसायकलचे बुकिंग सुरु केले आहे.
- ही इलेक्ट्रिक स्पोर्ट्स मोटरसायकल १०,००० रुपये टोकन रक्कम भरून बुक करू शकता.
- अल्ट्राव्हायोलेट F77 पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ आहे.
- अल्ट्राव्हायोलेट ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ही माहिती दिली आहे.