मुक्तपीठ टीम
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या २४ व्या दिवशीही युद्ध सुरुच आहे. रशियाकडून युक्रनेवर बॉम्बहल्ले सुरुच आहे. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यामुळे युक्रेन उध्वस्त झालं आहे आणि होत आहे. या विध्वंसातच युक्रेनने फुटलेल्या बॉम्बपेक्षाही भीषण समस्या मांडली आहे. युक्रेनच्या मते जे रशियन बॉम्ब फुटले त्यांनी घडवायचा तो विध्वंस घडवला, पण जे रशियन बॉम्ब स्फोट न होताच युक्रेनच्या भूभागात पडलेले आहेत, त्यांची भविष्यात कायम टिकटिकत राहणाऱ्या टाइमबॉम्बसारखी भीती राहणार आहे. युद्धानंतर जनजीवन सामान्य झाले तरी हे बॉम्ब निकामी करेपर्यंत भीती कायम राखणार आहेत.
तोपर्यंत युक्रेनला धोका कायम….
- २४ दिवसांपासून रशिया युक्रेनमध्ये सतत बॉम्ब हल्ले सुरु आहे.
- या बॉम्ब हल्ल्यामुळे अनेक शहरांमध्ये हाहाकार माजवला आहे.
- पण स्फोट न झालेले रशियन बॉम्ब ही आगामी काळात मोठी समस्या बनणार असल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे.
- युक्रेनचे म्हणणे आहे की स्फोट न झालेले बॉम्ब निकामी करण्यासाठी अनेक वर्षे लागतील.
- जोपर्यंत सर्व बॉम्ब निकामी होत नाहीत तोपर्यंत युक्रेनला धोका कायम राहणार आहे.
बॉम्ब निकामी करण्यासाठी अनेक वर्षे लागणार
- रशियन हल्ल्यानंतर स्फोट न करता बॉम्ब निकामी करण्यासाठी युक्रेनला अनेक वर्षे लागतील, असे युक्रेनचे गृहमंत्री डेनिस मोनास्टिर्स्की यांनी म्हटले आहे.
- रशियन सैन्याला रोखण्यासाठी विशेष ठिकाणी भूसुरुंगही टाकण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. युद्धानंतर त्यांना हटवणे हेही मोठे आव्हान असेल.
- २४ दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात युक्रेनमधील शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
- सुमारे ६५ लाख लोक विस्थापित झाले आहेत.
- अनेक शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यानंतरही रशियाचे आक्रमण सातत्याने सुरूच आहे.
- शुक्रवारीही रशियाकडून क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यामुळे युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे.