मुक्तपीठ टीम
रविवारी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक झाले. अकाऊंट हॅक केल्यानंतर प्रोफाईल फोटो बदलून तो व्यंगचित्राचा छेवण्यातालआला, तसेच हा फोटो अनेकांना टॅगही करण्यात आला. देशातील महत्वाच्या संस्थेचे ट्वीटर अकाऊंट हॅक होणारी ही तिसरी घटना आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या @ugc_india या ट्वीटर अकाऊंटचे २ लाख ९६ हजार इतके फॉलवर्स आहेत.
हवामान खात्याचे ट्विटर हँडल शनिवारी दोन तासांहून अधिक काळ हॅकर्सनी हॅक केले होते. हॅकर्सनी ते हॅक करून त्यावर NFT ट्रेडिंग सुरू केली. त्यात काही NFT ट्रेडिंगशी संबंधित असलेला पिन केलेला संदेश दाखवला. सुरुवातीला त्याचे प्रोफाइल पिक्चर बदलले होते, पण नंतर ते हटवण्यात आले. ते अकाऊंट पूर्ववत करण्यासाठी हवामान खात्याला सुमारे दोन तास लागले.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर हँडलही हॅक
- याआधी, शुक्रवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाचे ट्विटर हँडल हॅक करण्यात आले.
- सुमारे २९ मिनिटे ते हॅक करण्यात आले.
- यादरम्यान हॅकर्सनी अनेक ट्विट हटवले.
- यानंतर हे अकाऊंट काही काळासाठी निलंबित करण्यात आले.
- नंतर त्यावर नियंत्रण आले.
- दुसऱ्या दिवशी शनिवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
- सुमारे ४० लाख लोक या ट्विटर हँडलला फॉलो करतात.