Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पानटपरीवरची बिडी तशी झाली ईडी! टॉम अँड जेरीपेक्षा सध्या राजकीय माकडचेष्टा आवडतात!” – उदयनराजे

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
udayanraje Bhosale

मुक्तपीठ टीम

सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर होणाऱ्या ईडी करावाईमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्ष नेते यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरुच आहेत. यावरून आपल्या बेधडक विधानांवरून सर्वांचे लक्ष वेधून घेणारे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यातील ईडीच्या कारवाईवर भाष्य केलं आहे. माझ्या हातात ईडी द्या मग एकेकाला बघतोच असा इशारा उदयनराजेंनी दिला. तेसच ईडीची अवस्था पानटपरीवर मिळणाऱ्या बिडीसारखी झाली आहे असंही ते म्हणाले.

काय म्हणाले उदयनराजे भोसले?

  • उदयनराजेंनी बुधवारी साताऱ्यातल्या कास पठारावरील कामांची पाहणी केली.
  • त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
  • सध्याचे राजकीय परिस्थिती इतकी कुणी बिघडवली याचा विचार केला गेला पाहिजे.
  • तुम्हाला सांगतो, मला कार्टून नेटवर्कवरील टॉम अँड जेरी आवडतं, पण सध्या मी ते बघायचे बंद केले आहे.
  • आता सध्या सुरु असलेल्या राजकारण्यांच्या माकड उड्या बघत बसतो.
  • कोण कुणाला मारतंय, कोण कुणाला आत टाकतंय हे बघतो. खूप मजा येते

माझ्या हातात ईडी द्या, मग दाखवतो!

  • कोण म्हणतंय तो मुख्यमंत्री आहे का?
  • कोल्हापूरची सभा उत्कृष्ट झाली, लोक भरपूर आले, पण तुमची डिलिव्हरी काय होती? झिरो काही लोकांनी पैसे खाल्लेच आहेत, माझ्या हातात ईडी द्या, मग दाखवतो यांना.
  • ही ‘ईडी’ची चेष्टा झाली आहे.
  • पानपट्टीवर बिडी मिळते तशी अवस्था ‘ईडी’ची झाली आहे.
  • लावा ना ईडी.
  • घ्या ताब्यात सगळे.
  • यांना दांडक्याने सडकून काढले पाहिजे.

उदयनराजेंनी दिला इशारा…

  • एका बाजूला फुटपाथवर लोक झोपत आहेत, या लोकांना दिसत नाही का?
  • प्रत्येकाने एकमेकांची पाठ थोपटायची, जेलमध्ये आहे तरी त्याने काही केले नाही.
  • दीड वर्ष, दोन वर्ष जेलमध्ये पण त्याने काही केले नाही म्हणायचे.
  • लोकांना डोळे नाही, लोकांना मेंदू नाही, लोक हसतायत.
  • आता निवडणुका लागल्या तर ही मंडळी कशी उभी राहणार हे त्यांचे त्यांनाच माहिती आहे.
  • पण माझे नाव कोणी घेतले तर बघतो.
  • मी कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी माझ्या नादी लागू नये.

Tags: EDMaharashtraMVAudayan raje bhosaleईडीखासदार उदयनराजे भोसलेमहाराष्ट्रमहाविकास आघाडी
Previous Post

#मुक्तपीठ #LiVE भायखळा रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन

Next Post

चक्रव्यूह एमपीएससी परीक्षांचं: २०२०ला जाहिरात, २०२१ पूर्व परीक्षा, २०२२ अद्याप मुख्य परीक्षा नाही!

Next Post
MPSC

चक्रव्यूह एमपीएससी परीक्षांचं: २०२०ला जाहिरात, २०२१ पूर्व परीक्षा, २०२२ अद्याप मुख्य परीक्षा नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!