मुक्तपीठ टीम
सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर होणाऱ्या ईडी करावाईमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्ष नेते यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरुच आहेत. यावरून आपल्या बेधडक विधानांवरून सर्वांचे लक्ष वेधून घेणारे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यातील ईडीच्या कारवाईवर भाष्य केलं आहे. माझ्या हातात ईडी द्या मग एकेकाला बघतोच असा इशारा उदयनराजेंनी दिला. तेसच ईडीची अवस्था पानटपरीवर मिळणाऱ्या बिडीसारखी झाली आहे असंही ते म्हणाले.
काय म्हणाले उदयनराजे भोसले?
- उदयनराजेंनी बुधवारी साताऱ्यातल्या कास पठारावरील कामांची पाहणी केली.
- त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
- सध्याचे राजकीय परिस्थिती इतकी कुणी बिघडवली याचा विचार केला गेला पाहिजे.
- तुम्हाला सांगतो, मला कार्टून नेटवर्कवरील टॉम अँड जेरी आवडतं, पण सध्या मी ते बघायचे बंद केले आहे.
- आता सध्या सुरु असलेल्या राजकारण्यांच्या माकड उड्या बघत बसतो.
- कोण कुणाला मारतंय, कोण कुणाला आत टाकतंय हे बघतो. खूप मजा येते
माझ्या हातात ईडी द्या, मग दाखवतो!
- कोण म्हणतंय तो मुख्यमंत्री आहे का?
- कोल्हापूरची सभा उत्कृष्ट झाली, लोक भरपूर आले, पण तुमची डिलिव्हरी काय होती? झिरो काही लोकांनी पैसे खाल्लेच आहेत, माझ्या हातात ईडी द्या, मग दाखवतो यांना.
- ही ‘ईडी’ची चेष्टा झाली आहे.
- पानपट्टीवर बिडी मिळते तशी अवस्था ‘ईडी’ची झाली आहे.
- लावा ना ईडी.
- घ्या ताब्यात सगळे.
- यांना दांडक्याने सडकून काढले पाहिजे.
उदयनराजेंनी दिला इशारा…
- एका बाजूला फुटपाथवर लोक झोपत आहेत, या लोकांना दिसत नाही का?
- प्रत्येकाने एकमेकांची पाठ थोपटायची, जेलमध्ये आहे तरी त्याने काही केले नाही.
- दीड वर्ष, दोन वर्ष जेलमध्ये पण त्याने काही केले नाही म्हणायचे.
- लोकांना डोळे नाही, लोकांना मेंदू नाही, लोक हसतायत.
- आता निवडणुका लागल्या तर ही मंडळी कशी उभी राहणार हे त्यांचे त्यांनाच माहिती आहे.
- पण माझे नाव कोणी घेतले तर बघतो.
- मी कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी माझ्या नादी लागू नये.