मुक्तपीठ टीम
राज्यात मध्यावधी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्कप्रमुखाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. शुक्रवारीच शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी सध्याच्या महाराष्ट्राबद्दलच्या घोषणाबाजीमुळे मध्यावधी निवडणुकांची शक्यता वर्तवली होती.
राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात…
- उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा आज विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
- उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला संबोधित केलं.
- यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले.
- राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात.
- त्यामुळे कामाला लागा.
उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश-
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला प्रकल्प देण्याची घोषणा केली आहे.
- निवडणुका आल्यावरच अशा घोषणा केल्या जातात.
- त्यामुळे केंद्राकडून ही घोषणा करण्यात आली असून याचा अर्थ राज्यात निवडणुका लागू शकतात
- आपल्याला प्रत्येकाच्या घराघरात पोहचला हवं. आपला मुख्यमंत्री असताना केलेले काम घराघरात पोहचवा.
- राज्यात मध्यवधी निवडणुका लागतील, त्याला तयार राहा, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
अरविंद सावंतानीही केलं होतं विधान
- खासदार अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.
- २०१४ पूर्वी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका एकाचवेळी झाल्या होत्या.
- पण २०१२ नंतर विधानसभेची निवडणूक लागली. तेव्हा हिमाचल प्रदेशची निवडणूक आधी झाली.
- नंतर गुजरातची झाली.
- मधल्या काळात बऱ्याच घोषणा झाल्या.
- घोषणा झाल्या आणि निवडणुका लागल्या.
- आताही तेच होण्याची शक्यता आहे.