मुक्तपीठ टीम
दसरा आणि शिवतीर्थावर होणारा शिवसेनेचा मेळावा हे समीकरण अगदी घट्ट आहे. मात्र गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा झाला नाही. सभागृह आणि मोजक्या महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत आणि ऑनलाईन पद्धतीत या दोन वर्षात मेळावा पार पडला. मात्र आता कोरोनाचे संकट कमी झाल्याने यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल, अशी घोषणा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जे काही बोलायचं ते त्या मेळाव्यात बोलूच, असेही उद्धव ठाकरे म्हणालेत.
कंत्राटी कामगारांप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्रीही कंत्राटी!!
- मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचा सुवर्ण महोत्सव आज षण्मुखानंद सभागृहात दिमाखात पार पडला.
- त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपासह बंडखोर शिंदे गटावर निशाणा साधला.
- गेली अडीच वर्षे मी आत्ममग्न होतो असे विरोधक म्हणत आहेत.
- होय, मी. आत्ममग्न राहिलो.
- कारण महाराष्ट्र माझा आत्मा आहे.
- कोरोना संकटाच्या काळात महाराच्या आठ होतो आणि तिष्यातही राहीन’ असे ठाकरे यांनी ठणकावले.
- राज्यात वीज कंत्राटी कामगारांचा प्रश्न गंभीर बनला आहे.
- तोच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
- कंत्राटी कामगारांप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्रीही कंत्राटी आहेत.
- आपण त्या पदावर किती काळ राहणार हे त्यांनाच माहीत नाही.
सुरुवातच खोक्यांपासून झाली ते कोणाची प्रगती करणार?
- महाविकास आघाडी सरकारला जे तीन चाकाची रिक्षा म्हणत होते, त्यांचे आता दोन चाकाचे ‘ईडी’ सरकार झाले.
- महाविकास आघाडी सरकारने राज्याच्या विकासासाठी आणि कामगारांच्या हाताला काम मिळावे म्हणून अनेक गुंतवणूकदारांसोबत
- सामंजस्य करार केले.
- कागदावरील ती गुंतवणूक प्रत्यक्ष जमिनीवर आणली.
- मात्र आज ज्यांची सुरुवातच खोक्यांपासून झाली ते कोणाची प्रगती करणार? पुढे काय होणार? हे जनतेला दिसत आहे.
- त्यामुळे आम्ही विकासासाठी एकत्र आलोय अशी कोणी टिमकी मिरवू नये.
- आपण येत्या दसरा मेळाव्यात बोलणार आहोत असे सांगितले.