Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उद्धव ठाकरे: एमआयएम ही तर भाजपाची ‘बी’ टीम! भाजपा ही ‘हिजबुल सेना’!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Uddhav Thackeray

मुक्तपीठ टीम

शिवसेनेच्या विदर्भ मराठवाड्यातील शिवसंपर्क अभियानाला आज सुरुवात झाली. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदारांना संबोधित करताना भाजपावर सडकून टीका केली. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल हे गेले काही दिवस सातत्यानं महाविकास आघाडीला युतीची ऑफर देत आहेत. शिवसेना एमआयएमशी युतीच करू शकत नाही. ते शक्यच नाही. कारण एमआयएम ही भाजपाची ‘बी’ टीम आहे. भाजपाच्या इशाऱ्यावरच शिवसेनेला बदनाम करण्यासाठी एमआयएमचे प्रयत्न सुरु आहेत, असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. लवकरच महाराष्ट्रात जनतेशी संवादासाठी फिरणार असल्याचे संकेतही त्यांनी दिल्याचं कळते.

 

भाजपाचं हिंदुत्व राजकारणासाठी, भाजपा हीच हिजबुल सेना!

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर हल्ला करणाऱ्या भाजपावर त्याच मुद्द्यावर भाजपावर प्रतिहल्ला केला.
  • भाजपाचं हिंदुत्व हे फक्त राजकारणासाठीच आहे.
  • भाजपा काश्मिरात सत्तेसाठी मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत गेली होती.
  • भाजपा हीच खरी हिजबुल सेना आहे.
  • मविआ सरकारचा संबंध दाऊदशी जोडणं चुकीचं आहे.
  • विरोधक जाणीवपूर्वक तसं करत आहे, आपण च्या कुरापती ओळखायला शिकलं पाहिजे.

 

मंगळवारपासून शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान

  • शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान २२ मार्चपासून सुरु होणार आहे.
  • शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुख गावागावात जाऊन शिवसेनेची बांधणी करणार आहे.
  • या अभियानाची जबाबदारी दिलेले शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुख यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

 

शिवसंपर्क अभियानात विदर्भात कोणावर कोणती जबाबदारी?

  • खासदार संजय राऊत – नागपूर
  •  खासदार अरविंद सावंत- यवतमाळ
  • खासदार गजानन कीर्तिकर: अमरावती
  • खासदार श्रीकांत शिंदे: गडचिरोली
  • खासदार कृपाल तुमाणे: वर्धा
  • खासदार हेमंत पाटील: अकोला
  • खासदार संजय जाधव: बुलढाणा
  • खासदार प्रताप जाधव: वाशीम
  • खासदार प्रियंका चतुर्वेदी: भंडारा

 

शिवसेनेची मिशन २०२४साठी तयारी!

  • लवकरच उद्धव ठाकरेही महाराष्ट्रात फिरणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले असल्याचं कळतं.
  • लोकसभा निवडणुका आता दोन वर्षांवर आल्या आहेत, याकडे लक्ष वेधत त्यांनी मार्गदर्शन केले.
  • निवडणुका दोन वर्षांवर आल्यामुळे शिवसेनेच्या नेते-पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे.
  • शिवसेनेची बदनामी करणाऱ्या
  • विरोधकांना जशास तसे उत्तर द्या.
  • मला कण्याच्या, मानेच्या त्रासामुळे एका जागी थांबावं लागत आहे.
  • लवकरच मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरणार आहे. तुमची साथ असल्यामुळे एका ठिकाणी बसून राज्याचे काम पुढे नेत आहे.
  • महाविकास आघाडीचे निर्णय लोकांपर्यत पोहोचवा.

Tags: AIMIMBJPShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेभाजपाशिवसंपर्क अभियानशिवसेनाहिजबुल सेना
Previous Post

आई-वडिल जिवंत असताना मुलांचा मालमत्तेवर हक्क नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल!

Next Post

गुजरातमध्ये भाजपाचं १० काँग्रेस आमदार लक्ष्य, काँग्रेस नेत्यानं हाय कमांडचं वेधलं लक्ष! काही करणार?

Next Post
Modi shah sonia gandhi rahul gandhi

गुजरातमध्ये भाजपाचं १० काँग्रेस आमदार लक्ष्य, काँग्रेस नेत्यानं हाय कमांडचं वेधलं लक्ष! काही करणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!