मुक्तपीठ टीम
राज्यातील काही जिल्ह्यासह कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. मी याआधीही सांगितलं आहे की मी सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. पण सगळ्या पूरग्रस्तांना मदत नक्की करेन, असं उद्धव ठाकरे यावेळी ठामपणे सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी केली. स्थानिक नागरिकांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांना अतिवृष्टीमुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीत सरकारकडून पॅकेज जाहीर केलं जावं, या देवेंद्र फडणवीसांच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांनी “मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही. मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. माझे सहकारी मंत्री देखील मदत करणारे मंत्री आहेत. मी सवंग लोकप्रियतेसाठी काहीही करणार नाही हे आधीच सांगितलं आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे पूरग्रस्तांना तात्काळ मदत देण्यात येईल. अजूनही सांगली, कोल्हापूरच्या काही भागांत पाणी आहे. परिस्थितीचा सगळा अंदाज घेऊन पुढील कार्यवाही करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे; pic.twitter.com/Oeck3802Uy
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 30, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आपत्ती नियोजन
- नद्या फुगल्यामुळे येणाऱ्या अतिरिक्त पाण्याच्या नियोजनाचा आराखडा करून काम सुरू केलं जाणार आहे.
- कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते लक्षात घेता भूगर्भाचा अभ्यास करून त्या बाबतीत काही उपाययोजना केली जाणार आहे.
- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पूरबाधित क्षेत्रातील तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचेही चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर भर असणार आहे.
- हे साध्य करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील.
कठोर निर्णय घ्यावेच लागतील!
- नदी पात्रांच्या ब्लू आणि रेड लाईन आहे. त्यात झालेली अतिक्रमण आहेत. त्यामुळे पूर येत असतो.
- आता या पुढे ब्लू लाईन आणि रेड लाईनमध्ये बांधकामांना परवानगी देणार नाही.
- परवानगी देणार असाल तर या लाईन मारू नका. मग या लाईनला अर्थ काय?
- लोकांचे जीव गमावणं परवडणार नाही. या गोष्टी संकटाच्या निमित्ताने कराव्या लागणार आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.