Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे, कोल्हापूर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचा दिलासा

July 30, 2021
in घडलं-बिघडलं
0
cm uddhav thackeray

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांची पाहणी केली. पुराचा फटका बसलेल्या नागरिकांशी त्यांनी थेट संवाद साधत झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची एकत्रिक केलेली माहिती:

 

कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू

कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावा, येथील पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू, पूरग्रस्त भागाची पाहणी करत असून याबाबत जिल्हास्तरावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज दिले.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्या समवेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव सिताराम कुंटे, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहूल रेखावर, मनपा आयुक्त डॉ .कांदबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, शिरोळ नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार सत्यजित पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

नृसिंहवाडी तिर्थ क्षेत्र येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करुन पूरग्रस्त स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. तसेच पूरग्रस्तांसाठी निर्माण करण्यात आलेल्या पद्माराजे हायस्कूल शिरोळ येथील निवारा केंद्रास भेट देऊन संवाद साधला. नृसिंहवाडी येथे स्थानिकांनी सन २०१९ चा पूर, सध्या सुरु असलेली कोरोनाची परिस्थिती व आता आलेला महापूर यामुळे येथील सर्वच जनजीवन विस्कळीत झाले असून याबाबत ठोस कार्यवाही व्हावी, अशी मागणी स्थानिक पूरग्रस्त नागरिक, व्यापारी, देवस्थानचे पदाधिकारी यांनी केली.

पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील असा दिलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर शहरातील पंचगंगा हॉस्पिटल ते शिवाजी पुल रस्ता पूर बाधित भागाची पाहणी करताना नागरिकांना दिला.

 

यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

 

यावेळी पंचगंगा हॉस्पिटल परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात धान्य वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या व्यथा

नागरिकांनो! घाबरू नका, काळजी करू नका. सध्या आपण कोरोनाशी लढतो आहे. संयम बाळगा. येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभारगल्ली व परिसरातील पूरस्थितीवर मार्ग काढू. अशा आश्वस्त शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाहुपूरी ६ व्या गल्लीतील पूरबाधित राहिवाशांशी अत्यंत आत्मियतेने संवाद साधला. पुरामुळे बाधित झालेल्या स्थितीची पाहणी करण्यासाठी ते आज कोल्हापूरात आले होते.

 

यावेळी स्थानिक रहिवासी पूजा नाईकनवरे यांनी, आपत्कालीनस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी खूप आधार दिला असल्याचे सांगितले. तर पूरबाधित गणेश पाटील म्हणाले, यंदा २००५ व २०१९ पेक्षाही मोठा असून शासनाने भरीव मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतूराज पाटील, मुख्य सचिव सिताराम कुंटे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मनपा आयुक्त डॉ . कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते.

 


Tags: chief minister uddhav thackerayKolhapurMinister Hasan Mushrifधैर्यशील मानेमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराजेंद्र यड्रावकरसतेज पाटीलहसन मुश्रीफ
Previous Post

मी पॅकेजवाला नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री! -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

ठाकरे – फडणवीसांच्या शाहुपुरीतील भेटीत काय बोलणं झालं?

Next Post
ut vs df

ठाकरे - फडणवीसांच्या शाहुपुरीतील भेटीत काय बोलणं झालं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!