मुक्तपीठ टीम
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत शिवसेना बंडखोरांवर हल्लाबोल केला. बंडखोर आमदार सांगतात, आम्हाला गद्दार बोलू नका, त्यावर संजय राऊतांनी विचारलं असता. ठाकरे खाडकन बोलले, “विश्वासघातकी बोललो ना त्यांना. गद्दार कुठे बोललो? म्हणून आज विश्वासघातकी शब्द वापरलाय. त्यांचा पण मान ठेवला मी म्हणन त्यांना विश्वासघातकी बोललो गहार नाही बोललो.”
विश्वासघातकी बोललो ना त्यांना. गद्दार कुठे बोललो?
- मला एवढंच सांगायचे आहे, की आपण माझे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आभार मानले, मात्र मी या जनतेचा ऋणी आहे.
- त्यांना मी इतकेच सांगेन की, मघाशी जो उल्लेख केला की ‘वर्षा’ सोडून ‘मातोश्री’वर निघाल्यानंतर महाराष्ट्राच्या डोळयात जे पाणी होते त्या अश्रूंचे मोल मला आहे.
- त्या अश्रूंची किंमत या विश्वासघातक्यांना चुकवायला लावल्याशिवाय आपल्याला गप्प बसता येणार नाही, गप्प बसू नका ही माझी जनताजनार्दनाकडे प्रार्थना आहे.
- शेवटी जाता जाता एकच विचारतो, हे जे फुटीर लोक आहेत त्यांनी आपल्याला विनंती केली की, त्यांना गद्दार म्हणू नका…
- विश्वासघातकी बोललो ना त्यांना. गद्दार कुठे बोललो? म्हणून आज विश्वासघातकी शब्द वापरलाय.
- त्यांचा पण मान ठेवला मी म्हणन त्यांना विश्वासघातकी बोललो गहार नाही बोललो.
१६ आमदारांवर अपात्रतेची तलवार आहे…
- हो, आहेच ती.
- त्याच्याबद्दल मी आताच काही बोलणार नाही.
- कारण ते प्रकरण आता कोर्टात आहे.
- मात्र अनेक घटनातज्ञांच्या मतानुसार कायद्याने काय होणार हे लोकांना आता कळलेलं आहे.
- कारण जो कायदा आहे त्यात सगळं काही स्वच्छ आणि स्पष्ट आहे… आणि मला नाही वाटत की, आपल्या देशात घटनाबाह्य कृत्य करण्याची हिंमत कोणात असेल.
- न्यायालयात जे काही होईल ते होणार आहे.
- पण त्याच्यामुळे आता मला जास्त बोलायचे नाही.
- मात्र एकच सांगतो, की पूर्वी देव आनंदचा एक पिक्चर होता ‘हम दोनो! दोनोवरून बरंच काही आहे.
हो, एक दुजे के लिएसुद्धा आहेच…
- हो. बरंच काही आहे, पण त्यांनी जी निर्णयांना स्थगिती देण्याची घाई सुरू केली आहे त्यामध्ये आरे कारशेडचा निर्णय आहे.
- पण माझं एकच म्हणणं आहे की, माझ्यावरचा राग तुम्ही मुंबईवर काढू नका.
- मुंबईच्या पर्यावरणाचा घात होईल, असे काही करू नका.
- कारण तिकडे झाडांची कत्तल केल्यानंतरही बिबटया आणि इतर प्राण्यांचा वावर आहे.
- तिथे वन्यजीव असल्याचा रिपोर्टही आहे.
- त्याऐवजी कांजूरला ओसाड जागा आहे.
- ती कारशेड तिथे केली तर हीच मेट्रो आपल्याला अधिक लोकसंख्येसाठी वापरता येईल.
- आज ना उद्या कांजूरला हात घालावा लागणारच आहे.
- आतासुद्धा पुन्हा एकदा सांगतो की, आरे इथे कारशेड करताना यांनी जे प्रतिज्ञापत्र कोर्टात दिलंय की, एवढी जागा आम्ही वापरणार नाही, पण तेवढी जागासुद्धा त्यांना वापरावीच लागणार आहे.
- जिथे झाडं आहेत.
- तर केवळ तुमच्या हट्टापायी आरेमध्ये कारशेड करू नका.
कृपा करा, मुंबईचा घात करू नका..
- मग असे म्हणावे लागेल की, हे मुंबईच्या बाहेरचे असल्याने यांना मुंबईबद्दल प्रेम नाही की काय? मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असतो तो केवळ मुंबई, ठाणे किंवा नागपूरचा नसतो.
- मी मुख्यमंत्री असताना जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मी वने वाढवली आहेत.
- याचे मला समाधान आहे.
- मुंबईतसुद्धा मी ८०० एकर जंगल घोषित केले, अनेक रिझर्व्ह फॉरेस्ट मी. घोषित केले.
- येणाऱ्या काळात आणखी काही होणार होते.
- कारण शेवटी पर्यावरण महत्त्वाचे आहे. पर्यावरण संपले तर ऑक्सीजन कुठून आणणार?
मुंबईचा घात करण्याची योजना वाटते का? शिवसेनेचा जो पगडा मुंबईवर आहे…
- नक्कीच. ते त्यांचं जुनं स्वप्र आहे.
- आणि मी मागे म्हटलं होतं की, रावणाचा जीव जसा बेंबीत, तसा या राज्यकर्त्यांचा जीव मुंबईत आहे.
- असा हा प्रकार विचित्र आहे, दिल्ली मिळाली तरी मुंबई पाहिजे.
- आता खरं म्हटलं तर, त्यावेळी युती झाली तेव्हा शिवसेनाप्रमुखांचे एक वाक्य आहे की, ‘तुम्ही देश सांभाळा, मी महाराष्ट्र सांभाळतो.
- मात्र तुम्ही आम्हाला देशात पसरू देत नाही.
- तशीही लाल किल्ल्यावर भाषण द्यायची आमची इच्छा नाही.
- पण निदान महाराष्ट्रात आणि मुंबईत तुम्ही आम्हाला जागा देणार नसाल तर युतीला अर्थ काय?
- हाच तेव्हा बाळासाहेबांचा आणि आज आमचा सवाल आहे!
या वातावरणात ‘मराठी माणूस, शिवसेना, मुंबईचे भविष्य काय? कारण महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होतील….
- जो मुंबईवर भगवा फडकत आहे…तो पुन्हा फडकणार!
- त्याच्याविषयी शंका निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेनेचा पराभव करू अशा वल्गना सुरू आहेत…..
- ते सोडा हो.
- याच्या पूर्वी अनेकांनी म्हटलंय की, ‘शिवसेना’ या निवडणुकीनंतर राहणार नाही वगैरा मुंबईत आता मुंबईकर म्हणून सगळे एकत्र आलेत.
- त्यावेळी त्यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला की, हे मराठी ते अमराठी वगैरे, पण आता ही सगळी मंडळी मला येऊन भेटताहेत.
- मराठी, अमराठी अशी फूट पाडण्याचा प्रयत्न आजसुद्धा सुरू आहे.
- पण आता याला कोणी बळी पडणार नाही.
- मराठी माणसं एकवटली आहेत.
- तमाम मुंबईकर आज निवडणुकांची वाट बघतोय… आणि माझं मत असं आहे की, मुंबईच्याच नव्हे, तर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकाही व्हायला हव्यात.
शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होईल?
- का नाही होणार? आणि तो जर करायचा नसेल तर माझ्या लढाईला काय अर्थ आहे.
- माझं जे शिवसेनाप्रमुखांना वचन आहे ते आजही कायम आहे.
- मी तर शिवसेनेचाच आहे.
- मी पक्षप्रमुख आहे.
- पण माझा हेतू तो नव्हता.
- मी मुख्यमंत्री होणार असे मी बोललो नव्हतो आणि वचन पूर्ण केल्यानंतरसुद्धा मी काय दुकान बंद करून बसेन?
- शिवसेना मला वाढवायची आहे… आणि ती जर का वाढवण्याचा प्रयत्न मी सोडणार असेन तर मी कशाला पक्षप्रमुख?
आज राज्यातले वातावरण काय सांगतेय?
- आदित्य ठाकरे यांच्या दौऱयाला तुफान प्रतिसाद मिळाला….
- प्रचंड गर्दी उसळते आहे.
- सगळीकडे हीच चर्चा आहे की विश्वासघातक्यांना धडा शिकवायचा.
आपण कधी बाहेर पडणार? राज्यात दौरा कधी करणार?
- मी साधारणतः ऑगस्टमध्ये बाहेर पडणार.
- ह्याचं कारण असं की, गेल्याच आठवडयात जिल्हाप्रमुखांना काही सूचना दिल्यात, जास्तीत जास्त सदस्य नोंदणी, त्याच्यानंतर सक्रिय कार्यकर्त्यांची नोंदणी. हे मोठया प्रमाणात आता सुरू आहे.
- आता आदित्य फिरतोय. एका एका टप्याने जातोय. ठीक आहे.
- त्याच्यानंतर मी राज्यात फिरायला लागेन तेव्हा त्यात या लोकांना येण्यासाठी ही कामं सोडावी लागतील म्हणून मी तेवढयासाठी थांबलोय.
- एकदा ही नोंदणीची कामं होऊ द्या.
- मग मी बाहेर पडेन.
- सगळे नेते माझ्यासोबत फिरतील.
- अख्ख्या राज्याचा दौरा होईल.
- राज्यात वादळ निर्माण करू.
शिवसेनेचं तुफान या महाराष्ट्रात पुन्हा येईल?
- करावंच लागेल.
- शिवसेनेचं तुफान आहेच.
- लोकांच्या मनात, हृदयात आजही तुफान आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचं तुफान पुन्हा येईल