मुक्तपीठ टीम
शिवसेनेतील आमदार, खासदार आणि नगरसेवकांनी खिंडार पाडल्यानंतर जनसामान्यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पाठिंबा मिळत आहे. अनेकजण शिवसेनेत दाखल होऊन संघटनेसाठी काम करण्याची तयारी दाखवत असताना दिपक खरात नावाच्या एका शिक्षकाने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी तडकाफडकी नोकरीचा राजीनामा दिला. याच पार्श्वभूमीवर दिपक खरात गुरुजी यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांची दिपक खरात गुरुजींनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उध्दव ठाकरे यांनी खरात गुरुजींची व त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली.
उद्धव ठाकरे यांनी दिपक खरात गुरुजींना दिला आशीर्वाद
- शिवसेनेसाठी शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा देवून पूर्णवेळ पक्षसंघटनेचे काम करण्याचा निश्चय घेतलेले दिपक खरात गुरुजी यांना मातोश्रीवर बोलावण्यात आलेले होते.
- त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या शनिवार दि.३० जुलै रोजी मातोश्री निवासस्थानी जावून दिपक खरात गुरुजींनी सदिच्छा भेट घेतली.
- यावेळी उध्दव ठाकरे यानी खरात गुरुजींची व त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली.
- खरात गुरुजींची राजीनामा देण्यामागची भूमिका समजावून घेतली.
- त्यांनी गुरुजींचे शिवसेनेमध्ये स्वागत केले, आशीर्वाद दिला.
गुरुजींना शिवसेनेमध्ये जबाबदारीने काम करण्यास सदिच्छा!!
- शिवसेनेमध्ये जबाबदारीने काम करण्यास शुभेच्छा दिल्या.
- यावेळी शिक्षक सेनेचे प्रमुख अभ्यंकर उपस्थित होते.
- तसेच यावेळी मातोश्रीवर उपस्थित असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत यांनी सदिच्छा दिल्या. विधानपरिषद उपनेत्या निलम गोऱ्हे तसेच शिवसेना सचिव आदेश बांदेकर, उपनेते सचिन आहेर यांनी फोनवरून सदिच्छा दिल्या.