Thursday, May 29, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लॉकडाऊन नाही, पण इशारा! टीका करणाऱ्या, मास्क न घालणाऱ्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले!!

April 6, 2021
in Uncategorized, घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
uddhav thackeray appeal 2-4-21

मुक्तपीठ टीम

 

महाराष्ट्रात सध्या तरी लॉकडाऊन नसणार. मात्र, जर परिस्थिती सुधारली नाही, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला नाही तर दोन दिवसात त्यावर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना दिला. मी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणतो, तेव्हा मी कुटुंबप्रमुख आणि तुम्ही सर्व माझे कुटुंब असे मला म्हणायचे असते. त्यामुळेच तुमच्या हितासाठी वेळ आली तर वाट्टेल तो निर्णय मी घेईन.  आज महाराष्ट्राशी संवाद साधताना भाजपाच्या नेत्यांची नावे न घेता त्यांना चांगलेच फटकारले. तसेच मास्कविना फिरणाऱ्या, त्याचं समर्थन करणाऱ्या राज ठाकरेंसारख्या नेत्यांचेही कान टोचले. ते म्हणाले, मास्क न घालणे म्हणजे शूरता नाही!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे:

  • मी म्हणालो होतो की परिस्थिती अशीच राहिली, तर आपल्याला लॉकडाऊन लागू करावं लागतोय की काय, अशी शक्यता होती. ती परिस्थिती आजही कायम आहे.

 

  • मधल्या काळात आपण शिथिल झालो, लग्नसमारंभ, पार्ट्या, राजकीय मोर्चे, आंदोलनं सुरू झाले. कोरोना गेला, अशा रितीने सगळं सुरू होतं.

 

  • दुर्दैवाने सगळे तज्ज्ञ जी भिती व्यक्त करत होते, ती खरी ठरली. मार्चमध्ये गेल्या वेळेपेक्षाही आक्राळ विक्राळ रुप धारण करून कोरोना आलाय.

 

  • हा विषाणू आपली परीक्षा बघतोय. आपल्याला धैर्याने एकत्र लढण्याची गरज आहे.

 

  • काही कडक निर्बंध येत्या काही दिवसांत लावावे लागतील. ते उद्या किंवा परवा जाहीर होतील.

 

  • कार्यालयांना याआधीच सूचना दिल्या आहेत. काही नियम आधीच लागू आहेत.

 

  • सगळ्या ट्रेन तुडुंब भरून चालल्या आहेत. रोजगार परत मिळतील, पण जीव परत मिळणार नाही.

 

  • आज मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण लॉकडाऊन लागू करत नाहीये. पण दोन दिवसांत मला दृश्य स्वरूपात फरक दिसला नाही, आणि ज्यांच्याशी मी बोलतोय, त्यांच्याकडून वेगळा पर्याय दिसला नाही, तर जगात ज्या प्रमाणे लॉकडाऊनचे टप्पे जाहीर केले जातात, तसे करावे लागतील.

 

  • आपण काहीही लपवलेलं नाही आणि लपवणार नाही. म्हणून आपण सत्य परिस्थिती सगळ्यांसमोर ठेवतो.

 

  • दुसरीकडे काय झालं, फक्त महाराष्ट्रात कसे वाढतात? यावर मला बोलायचं नाही. मला कुणी व्हिलन ठरवलं, तरी मी माझी जबाबदारी पार पाडेन.

 

  • लॉकडाऊनचा उपयोग संसर्ग थांबवण्यासाठी आणि आपली आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आहे.

 

  • रुग्णवाढ ही सध्या झपाट्याने होत आहे. राज्यात १७ सप्टेंबर २०२० रोजी ३ लाख सक्रिय रुग्ण होते. १ एप्रिलला त्यात भर पडली आहे. तेव्हा ३१ हजार मृत्यू होते. आता ५४ हजार ९०० च्या आसपास रुग्ण झाले आहेत.

 

  • तेव्हा एका दिवशी २४ हजार रुग्ण आढळले होते. १ एप्रिलला ४३ हजारहून जास्त रुग्ण आढळले आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली, तर १५ ते २० दिवसांत आपल्याकडच्या आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागतील.

 

  • आरोग्यसुविधा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. पण बेड वाढले, व्हेंटिलेटर्स वाढले, आयसीयुचे बेड वाढले, तरी डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी कसे वाढणार? हाच खरा चिंतेचा विषय आहे.

 

  • डॉक्टर, नर्स, कर्मचारी आपल्यासारखेच माणसं आहेत. त्यांच्यापैकी अनेक कोरोनाग्रस्त झाले. त्यानंतर निगेटिव्ह झाल्यानंतर पुन्हा कोरोना रुग्णांच्या सेवेत येत आहेत. परंतु एकदा कोरोनाने ग्रासले, तो बरा झाला तरी अशक्तपणा कायम राहतो.

 

  • टेस्टिंग करण्यासाठी घराघरात जाऊन आपलेच बंधू-भगिनी अथकपणे काम करत आहेत. त्यांना आपण दिलासा देणार आहोत की नाही?

 

  • बोलणारे बोलतातच. आपण लसीकरण वाढवलं पाहिजे. कालच्या दिवसात महाराष्ट्रात ३ लाख नागरिकांना लसीकरण केलं आहे. देशात एकाच दिवशी होणाऱ्या लसीकरणाचा हा सर्वाधिक आकडा आहे. आत्तापर्यंत आपल्या ६५ लाख नागरिकांना लसीकरण केलं आहे. आपल्या क्षमतेनुसार लशींचा पुरवठा होत नाहीये. ती मागणी मान्यही होईल.

 

  • अमेरिकेने लॉकडाऊनचा ७ कलमी कार्यक्रम जाहीर केलाय. राजकारणापेक्षा जीव महत्वाचा असं आवाहन केलंय. आपल्याकडच्या राजकीय पक्षांनी देखील त्यांचं नाही, पण मी केलेलं आवाहन तरी मानावं. त्यात राजकारण करण्याचं कारण नाही.

 

  • आपण कात्रीत सापडलो आहोत. अर्थचक्र चालवायचंय, तर अनर्थ ओढवतोय. अनर्थ टाळायचा, तर अर्थचक्र थांबतंय.

 

  • मधल्या काळात अनेक तज्ज्ञ सल्ले देत आहेत, “सर्वसामान्यांना त्रास होईल, अशी लॉकडाऊनची भूमिका आम्ही खपवून घेणार नाही. तुम्हाला आलेला झटका हा नियम नको. कोरोनाच्या संसर्गाला लॉकडाऊन पर्याय नाही. हिटरलसारखे वागू नका. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय असू शकत नाही. लॉकडाऊन लावायचा तर रोजगाराचे पैसे थेट खात्यात जमा करा”.

 

  • एका उद्योगपतीने सांगितलं की लॉकडाऊनऐवजी आरोग्यव्यवस्था वाढवा. मी ते सगळं करतो, पण किमान रोज ५० डॉक्टर, कर्मचारी यांचा पुरवठा महाराष्ट्रात होईल, याची सोय करा. फक्त फर्निचरचं दुकान म्हणजे हॉस्पिटल होत नाही.

 

  • अर्थचक्र आणि जनतेचा जीव वाचवणे या कात्रीत आपण सापडलो आहोत.

 

  • कोरोनाच्या काळात राजकारण नको

 

  • लॉडाऊनविरोधात नव्हे तर लॉकडाऊन होणार नाही, यासाठी रस्त्यावर उतरा. डॉक्टर, आरोग्य सेवक यांच्या मदतीसाठी कोरोना विरोधातील लढाईसाठी रस्त्यावर उतरा. आरोग्य सेवकांसाठी रस्त्यावर उतरा. ज्यांच्या कुटुंबात कोणी कर्ते नाही त्यांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरा

 

  • कोरोना रोखण्यासाठीच्या सूचनांचे पालन केल्यास लॉकडाऊन टाळता येणार आहे.

 

  • काहीजण म्हणतात, मी मास्क वगैरे वापरत नाही. वापरणार नाही. मास्क न लावणे म्हणजे शूरता नाही, मास्क लावण्यात लाजायची गरज नाही. मास्क वापरण्याची लाज नको.

 

  • सरकार लॉकडाऊन लावणार की नाही, याऐवजी मी कोरोनाशी लढणार या निर्धाराची गरज

 

  • जनतेला जिवाशी खेळू नका, राजकारण करू नका

Previous Post

“राज्यात कायदा – सुव्यवस्थेचा बोजवारा, भ्रष्टाचाराचा कळस”

Next Post

राज्यात ५० हजाराकडे उसळती लाट, मुंबई, पुणे अतिगंभीर!

Next Post
mcr 2-1-21

राज्यात ५० हजाराकडे उसळती लाट, मुंबई, पुणे अतिगंभीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!