Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उदयनराजे आक्रमक: ज्यांना मानता, त्यांच्या अपमानाचा संताप का नाही?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Udayanraje Bhosle

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानानंतर ते एकाकी पडले आहेत. विरोधी पक्षांच्या जोरदार विरोधानंतर, आता भाजपानेही कोश्यारींचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे. आज भाजपाचे उदयनराजे भोसलेही आक्रमक झाले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापत चाललं आहे. राज्यपालांचा निषेध करत त्यांना पदमुक्त करण्यासाठी जागोजागी आंदोलनं केली जात आहेत. खासदार उदयनराजे भोसलेंनी राज्यपालांनी केलेल्या विधानावरुन त्यांना चांगलंच सुनावलं आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत, महाराजांच्या अपमानाचा राग कसा येत नाही, महाराजांबाबत बेगडी प्रेम का दाखवता, असा सवालही त्यांनी राजकारण्यांना आणि राजकीय पक्षांना विचारला आहे.

पत्रकार परिषद घेऊन उदयनराजे भोसले काय म्हणाले?

  • तुम्हाला काहीच वाटत नसेल तर शिवाजी महाराजांची जंयती साजरी का करायची?
  • महाराजांचे पुतळे कशाला उभारायचे?
  • विमानतळाला महाराजांचं नाव कशाला घ्यायचं. मला हे असं बोलताना वेदना होत आहेत.
  • जर तुम्हाला महाराजांचा सन्मान ठेवता येत नसेल, तर त्यांचं नाव घेण्याचंही हक्क तुम्हाला नाही.
  • शिवाजी महाराजांनी आपल्या देशाला लोकशाही आणि सर्वधर्मसमभावाचा विचार दिला. पण आज ठिकठिकाणी केवळ स्वार्थापोटी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर सुरु आहे.
  • आम्ही त्यांच्या मार्गावर आणि आदर्शावर चालत आहोत, असे सर्वजण म्हणतात. मग शिवाजी महाराजांविषयी इतक्या विकृत पातळीवर जाऊन वक्तव्य होत असताना, त्यांची अवहेलना होत असताना, कोणालाच चीड कशी येत नाही?
  • सर्व राजकीय पक्षांचा अजेंडा वेगवेगळा असला तरी त्यांचा मुलभूत विचार हा शिवाजी महाराजांच्या आदर्शांना अनुसरून आहे. मग हे सर्वजण छत्रपतींचा अपमान होत असताना एकत्र येऊ आवाज का उठवत नाहीत, असे उदयनराजे भोसले यांनी प्रश्न उपस्थित केले.

३ डिसेंबरला रायगडावर आक्रोश करण्याचा इशारा!

उदयनराजे भोसले म्हणाले की, “मी येत्या ३ डिसेंबरला महाराजांची समाधी असलेल्या रायगडावर जाणार आहे. आपण सर्वांनी यावे. महाराजांचा अपमान झाला आहे त्याबद्दल प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार आहे.” असेही ते म्हणाले.


Tags: BJPChhatrapati Shivaji MaharajControversial Statementmaharashtra Governor Bhagat Singh KoshyarimuktpeethUdayanraje Bhosleउदयनराजे भोसलेघडलं-बिघडलंछत्रपती शिवाजी महाराजभाजपामहाराष्ट्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारीमुक्तपीठवादग्रस्त वक्तव्य
Previous Post

मराठी आयपीएस शिवदीप लांडेंपुढे बिहारात भलती समस्या, कॉलगर्लनं पळवला फुकट्या डीएसपींचा स्मार्टफोन!

Next Post

मंजू जैनची गगनातून जमिनीकडे झेप! १० हजार फुटांवरून उडी मारणारी पहिली भारतीय महिला सैनिक!

Next Post
Manju Jain

मंजू जैनची गगनातून जमिनीकडे झेप! १० हजार फुटांवरून उडी मारणारी पहिली भारतीय महिला सैनिक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!