मुक्तपीठ टीम
सातारा क्रीडा संकुलाच्या दुरावस्थेवरून खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र, केवळ त्यावरच न थांबता क्रीडा संकुल उभारलं तेव्हाच्या तत्कालीन पालकमंत्र्यांना मुस्काडलं पाहिजे अशी भाषा त्यांनी वापरली आहे. उदयनराजे भोसले यांनी अजित पवारांचं नाव घेण टाळलं असलं तरी क्रीडा संकुल उभारलं तेव्हाचे तत्कालीन पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार होते, त्यामुळे त्यांचा रोख कुणावर ते सर्वांनाच कळले. सातारा जिल्हा बँकेचे साताऱ्यातच ठरणार पुण्यात नाही, असे ठणकावून सांगणाऱ्या उदयनराजेंनी आता स्टेडियमच्या निमित्ताने पुन्हा पवारांवरच संताप व्यक्त केल्याने त्यांच्या संतापाचं खरं कारण काय, अशी चर्चा सुरु झाली आहे.
उदयनराजेंचा संताप
- खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा एसटी स्टँड नजीक काही वर्षांपूर्वी उभारलेल्या क्रीडा संकुलबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
- चुकीच्या पद्धतीने हे संकुल उभे केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
- त्याकाळी रणजी ट्रॉफी शाहू स्टेडियमवर भरवल्या जात होत्या.
- रणजीही झाल्या. तेव्हा ट्रॉफीची मॅचेस घेऊ शकलो असतो.
- सातारा प्राईम एरिया आहे. स्टँडच्या शेजारी आहे.
- एवढं असताना संकुल उभारलं गेलं नाही. बी. जी. शिर्केंनी बालेवाडीचं स्टेडियम कॉमन वेल्थसाठी बांधलं होतं.
- त्यांनी आपल्या संकुलासाठी निघालेल्या टेंडरसाठी फॉर्म भरला होता.
- हे का सांगतो, हे मीडियात आलं पाहिजे.
- हे आमदार, खासदार जी सो कॉल्ड माकडं आहेत ना, या सगळ्यांनी त्यातून बोध घ्यायला हवा.
- राजकारणापलिकडे जाऊन विचार करायला पाहिजे.
- स्पोर्ट्स आणि इतर ठिकाणी राजकारण आणू नये.
- इकडे वाट्टोळं करून टाकलं सर्वांचं.
स्टेडियमच्या बाहेरून गाळे कसे बनवले?
- स्टेडियमचं टेंडर काढलं होतं, व्यापारी संकुलाचं नाही
- त्यावेळी पालकमंत्री होते इकडचे. त्यांनी या सर्वांवर उत्तर द्यावं.
- प्रत्येकवेळी मी नाही… मी नाही… मी काय केलं मी काय केलं… मुस्काडलं पाहिजे यांना…ऐन मोक्यावरची जागा कशी मिळणार? ज्यांनी बांधकाम केलं… आपण टेंडर काढलं होतं स्टेडियमचं.
- आपण काही व्यापारी संकुलाचं टेंडर काढलं नव्हतं.
- स्टेडियमचे टेंडर काढलेले असताना स्टेडियमच्या बाहेरून गाळे कसे बनवले?