मुक्तपीठ टीम
भारताचे सेना कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना सेवा पुरवणारी, आघाडीची ग्राहक-तंत्रज्ञान स्टार्ट-अप कंपनी उडचलोने सेना कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना लागू असलेली वयाची अट रद्द करून आता सर्व डिपेन्डन्ट्सना आपल्या सेवाकक्षेत सामावून घेतले आहे. उडचलोच्या दहाव्या स्थापना दिनाच्या निमित्ताने ही घोषणा करण्यात आली आहे. आता यापुढे २५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे डिपेन्डन्ट्स देखील उडचलोचे लाभ, विशेष सूट मिळवून परिवाराला भेटताना आणि भविष्यातील सुट्ट्यांचे नियोजन करताना लक्षणीय रकमेची बचत करू शकतील. संपूर्ण फौजी परिवाराला सेवा पुरवण्याच्या आणि त्या सर्वांना एकाच छत्राखाली आणून समान ओळख व समान वंश असलेल्या विशेष युजर समूहाला अपवादात्मक लाभ मिळवून देण्याच्या व्हिजनला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे.
आजवर उडचलोच्या एक्सक्लुसिव्ह पोर्टलवर फक्त सक्रिय व सेवानिवृत्त सेना कर्मचारी आणि त्यांच्यावर थेट अवलंबून असलेल्या व्यक्तींना सेवा पुरवल्या जात होत्या. आता सेना कर्मचाऱ्यांच्या, २५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलगा आणि मुलगी यांना देखील उडचलो फौजी परिवारात सहभागी करवून घेण्यात आले आहे. यामुळे आता या स्टार्ट-अपची ग्राहक संख्या २.८ मिलियनवरून ३.८ मिलियन इतकी वाढेल.
संरक्षण दलांमधील लोकप्रिय उडचलो हे भारतीय विमान वाहतूक उद्योगातील एक श्रेणी निर्माता असून त्यांनी ‘डिफेन्स फेयर्स’ ही संकल्पना पहिल्यांदा आणून या क्षेत्राला या ग्राहकांची ओळख पहिल्यांदा करून दिली. हळूहळू उडचलोने प्रवास, घर, आर्थिक सेवा, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स आणि युटिलिटी बिल पेमेंट सुविधा यांचा देखील आपल्या सेवांमध्ये समावेश केला आहे. सेना कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचे जीवन सहज, सुरळीत व्हावे यासाठी आपल्या सेवांमार्फत त्यांना सुविधा प्रदान करणे हे उडचलोचे उद्दिष्ट आहे. ७०% एक सर्वात जास्त एनपीएस आणि ९०% उत्कृष्ट सीएसएटी असलेल्या उडचलोच्या ग्राहकसेवा या क्षेत्रातील सर्वोत्तम असून तब्बल २.८ मिलियन सेना कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती त्यांच्या सेवांचा लाभ घेत आहेत.
उडचलोचे संस्थापक आणि सीईओ, श्री. रवी कुमार म्हणाले, “संरक्षण समुदाय म्हणजे एकमेकांशी अतिशय घट्ट जोडले गेलेले कुटुंब आहे आणि त्यांचे हे संबंध संपूर्ण जीवनभरासाठीचे आहेत! प्रत्येक मुलाची स्वप्ने, उद्दिष्ट्ये पूर्ण व्हावीत यासाठी संपूर्ण समुदाय त्याच्या पाठीशी उभा राहतो, मग ती उद्दिष्ट्ये संरक्षण दलाशी संबंधित असो वा नसो. ‘एक प्रचंड मजबूत राष्ट्र निर्माण करणे’ हे एकच ध्येय या संपूर्ण समुदायासमोर आहे, समुदायामध्ये जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनावर हे ध्येय बिंबवले जाते. या सेवांच्या कक्षेत आपल्या मुलामुलींनाही सामावून घ्यावे अशा विनंत्या आमच्याकडे सतत केल्या जात होत्या. याआधी उडचलोने एयरलाईन्सच्या करारानुसार ‘डिफेन्स फेयर्स’ दिले होते आणि सरकारने आखून दिलेल्या व्याख्येमध्ये राहून त्याचे पालन करणे आम्हाला भाग होते. आज उडचलो अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा प्रदान करते आणि आता आम्ही या सेवा संपूर्ण परिवारासाठी उपलब्ध करवून देत आहोत. मी स्वतः एका सेना कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याने या सर्व भावना मी खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो.”
उडचलोची सुरुवात २०१२ साली झाली, तेव्हापासून त्यांनी प्रवास, आर्थिक सेवा, घर, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि विविध सेवासुविधांची बिले यांचा समावेश आपल्या सेवांमध्ये करून आपल्या ग्राहकांना खूप मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करवून दिल्या आहेत. गेल्या १० वर्षात या स्टार्टअपने आपल्या देशाच्या सैनिकांना विशेष दरांमध्ये उत्पादने व सेवांचा लाभ मिळावा यासाठी देशभरात ७० पेक्षा जास्त आउटरीच सेंटर्सचे स्वतःचे विशाल नेटवर्क उभारले आहे.