मुक्तपीठ टीम
उत्तराखंडमधील पर्यटन स्थळ असलेल्या औली येथील गौरसो टॉप येथे मृतावस्थेत सापडलेल्या दोन पर्यटकांची पोलिसांनी ओळख पटवली आहे. मृतांमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. जोशीमठ पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार, संजीव कुमार गुप्ता ५० वर्ष, मुलगा आर.एस. गुप्ता, रा. फ्लॅट नंबर २००६, २० वा मजला, भारत मिल म्हाडा कॉम्प्लेक्स, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल पश्चिम मुंबई आणि सींशा गुप्ता ३५ वर्ष महाराष्ट्रातील रहिवासी अशी या मृतांची ओळख पटली आहे.
दोन्ही मृतदेह बर्फात दबलेले आढळले
- दोन्ही मृतदेह सीएचसी जोशीमठ येथे ठेवण्यात आले आहेत.
- दोन्ही मृतदेहांचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
- एसडीआरएफ पोस्ट जोशीमठचे मुख्य हवालदार लवकुश यांनी सांगितले की, जोशीमठ पोलीस स्टेशनमधून माहिती मिळाल्यानंतर एसडीआरएफची टीम औलीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या गोडसू नावाच्या ठिकाणी पोहोचली.
- येथे दोन मृतदेह पडलेले आढळले. बहुधा हे पर्यटक औलीला भेट देण्यासाठी आले होते. जास्त बर्फवृष्टीमुळे दोघेही बर्फात दबले गेले.
बर्फाळ ठिकाणी रात्रीच्या मुक्कामाची कोणतीही सोय नाही
वनविभागाच्या चौकीत औलीच्या दहा क्रमांकाच्या टॉवरवर दोन पर्यटक आल्याची माहिती काही पर्यटकांनी दिली होती. चहूबाजूंनी जंगलाने वेढलेले गौरसन बुग्याल आजकाल बर्फाने वेढलेले आहे. इथे रात्रीच्या मुक्कामाची सोय नाही. गौरसन बुग्यालमध्ये दिवसभर बर्फाचा आनंद घेतल्यानंतर रात्रीच्या विश्रांतीसाठी पर्यटक औली येथे पोहोचतात.
तपासानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल
- नंदा देवी राष्ट्रीय उद्यानाच्या वन अधिकारी चेतना कांडपाल यांनी सांगितले की, संध्याकाळी एका पर्यटकाने गौरसन टॉपमध्ये दोन लोक पडल्याची माहिती दिली, ज्यावर वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा दोन्ही पर्यटक मृतावस्थेत आढळले.
- वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्यटकांचे सामान ताब्यात घेऊन एसडीआरएफ आणि जोशीमठ पोलीस ठाण्यात माहिती दिली.
- ते म्हणाले की, एसडीआरएफ आणि पोलिसांचे पथक मृतदेह आणण्यासाठी गौरसन बुग्यालला रवाना झाले.
- जोशीमठचे एसएचओ राजेंद्र सिंह खोलिया यांनी सांगितले की, दोन्ही पर्यटकांचा मृत्यू कसा झाला हे तपासानंतरच कळेल.