मुक्तपीठ टीम
घार उडते आकाशी पण लक्ष तिचे पिल्लांपाशी…लोकांशी नाळ जुळलेल्या नेत्यांचंही असंच असतं. ते कितीही मोठे झाले तरी त्यांचं त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांशी असलेलं नातं कायम असतं. त्यांची मतदारांशी जुळलेली नाळ कायमच असते. देशाचे परिवहन मंत्री, भाजपाचे मातब्बर नेते असलेले नितीन गडकरी हे कितीही मोठे झाले तरी ते नागपूरचे खासदारही आहेत. त्या जबाबदारीतूनच त्यांनी कोरोना संकटात नागपूरला शक्य ती सर्व मदत केली.
ऑक्सिजन, रेमडेसिविर सर्व टंचाईंवर मात केली. ताजं उदाहरण त्यांनी रक्तपेढीला दिलेल्या भेटीचं आहे. सद्यस्थितीत कोरोनावरील उपचारांमध्ये प्रभावी ठरत असलेल्या प्लाझ्मा थेरपीसाठी मोठ्या प्रमाणावर असलेली प्लाझ्माची मागणी लक्षात घेत नितीन गडकरी यांनी विदर्भातील सर्वांत जुन्या व जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध असलेल्या डॉ. हेडगेवार रक्तपेढीला दोन प्लाझ्मा अफेरेसिस मशिन उपलब्ध करून दिल्या आहेत.
सध्या रक्तपेढीकडे दररोज ७० ते ८० बॅग प्लाझ्माची मागणी होत असून एका मशिनद्वारे दिवसाला केवळ २० बॅगची प्रक्रिया होऊ शकत असल्याने उपलब्ध दोन प्लाझ्मा मशिन या मागणीसाठी अपुऱ्या पडत आहेत. अशा वेळी पुरवण्यात आलेल्या या अतिरिक्त दोन मशिनमुळे कोरोना रुग्णांसाठी सुरक्षित व तंत्रशुद्ध पद्धतीने तयार केलेला प्लाझ्मा कमी वेळात व योग्य दरात उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
पाहा व्हिडीओ: