मुक्तपीठ टीम
स्टार्टअप्सच्या युगात अनेक तरुण आपली स्वतंत्र झेप घेण्याचा प्रयत्न करतात. पण मोठ्या ग्लोबल ब्रँड्समधील मोठी पदं सोडून अशी अवघड वाट कमीच चालतात. मनीष माहेश्वरी हे ट्विटर इंडियाचे सीईओ होते. तर तनय प्रताप मायक्रोसॉफ्टचे मुख्य तांत्रिक अधिकारी होते. पण ६ महिन्यांपूर्वी दोघांनीही नोकरी सोडून जगातील पहिल्या 3D लर्निंग व्हर्च्युअल लर्निंग प्लॅटफॉर्मचा पाया रचला. हे इनव्हॅक्ट मेटाव्हर्ससिटी म्हणून ओळखले जाणारे स्टार्टअप आहे. जगभरातून सुमारे ७० लोकांनी या स्टार्टअपला निधी दिला आहे.
जगातील ७० गुंतवणूकदारांनी दाखवला विश्वास!
- जगभरातील सुमारे ७० गुंतवणूकदारांनी या एड-टेक आधारित प्लॅटफॉर्ममध्ये ३७ कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.
- यामध्ये भारताचे अरकम व्हेंचर्स अँड अँटलर, जर्मनीचे पायकस कॅपिटल, सिंगापूरचे एम व्हेंचर पार्टनर्स, दुबईचे बीईसीओ कॅपिटल आणि अमेरिकेचे २एएम व्हीसी यांचा समावेश आहे.
- ही गुंतवणूक अशा वेळी आली आहे जेव्हा अनेक क्षेत्रातील यशस्वी जागतिक उद्योजकांनी काही दिवसांपूर्वीच ३३ दशलक्ष मुल्यांकनाने इनव्हॅक्ट मेटाव्हर्ससिटीमध्ये गुंतवणूक केली होती.
इनव्हॅक्ट मेटाव्हर्ससिटी म्हणजे काय?
- इनव्हॅक्ट मेटाव्हर्ससिटी हे जगातील पहिले ३डी इमर्सिव्ह व्हर्च्युअल लर्निंग प्लॅटफॉर्म आहे.
- हे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील विद्यार्थ्यांना अॅनिमेटेड अवतारांद्वारे इतर विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांशी संवाद साधण्याची परवानगी देते.
- विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल जगात एकत्र फिरण्याची परवानगी देऊन, ते त्यांना एकमेकांकडून शिकण्याची संधी देते.