मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय महिला आयोगाने वायुसेनेच्या महिला अधिकाऱ्याच्या लैंगिक छळ आणि नंतर डॉक्टरांनी केलेल्या टू फिन्गर टेस्टबाबत स्वत:हून दखल घेतली आहे. या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आयोगाने वायु सेनेच्या डॉक्टरांनी केलेली टू फिंगर टेस्ट महिला अधिकाऱ्याच्या सन्मानाचे आणि गोपनीयतेचे उल्लंघन असल्याचे सांगितले आहे. ही कृती सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्याही विरोधात आहे, ज्यात अशा टेस्टवर बंदी घालण्याचे म्हटले होते. या प्रकरणात महिला अधिकाऱ्याने तिच्याच सहकाऱ्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाचे म्हणणं काय?
- या प्रकरणी महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनीही एअर चीफ मार्शल यांना पत्र लिहून आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे.
- आयोगाने म्हटले की, हवाई दलाच्या डॉक्टरांना मार्गदर्शक तत्त्वांबद्दल सांगितले पाहिजे.
- २०१४ मध्ये इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनेही टू फिन्गर टेस्टला अवैज्ञानिक असल्याचे म्हटले होते.
- टू फिन्गर टेस्टला चुकीचे ठरवत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, एखाद्या व्यक्तीवर बलात्कार झाला आहे की नाही याची पुष्टी करता येत नाही.
- जर कोणी नियमित संबंध ठेवत असेल तर ही चाचणी कशी प्रभावी होईल, असे न्यायालयाने म्हटले होते.
कसं करतात टू फिन्गर टेस्ट?
- खरं तर टू फिन्गर टेस्ट ही एक मॅन्युअल प्रक्रिया आहे.
- याअंतर्गत, डॉक्टर एक किंवा दोन बोटे घालून पीडितेच्या योनीची तपासणी करतात की ती व्हर्जिन आहे की नाही.
- जर बोटं सहज आत गेली तर ती लैंगिकदृष्ट्या सक्रिय असल्याचे मानले जाते.
- यासह, तेथे उपस्थित हायमन देखील शोधले जाते.
- या प्रक्रियेवर कठोर टीका करण्यात आली आहे, ज्याला सर्वोच्च न्यायालयानेही स्थगिती दिली आहे.
- हे पीडितेच्या सन्मानाविरूद्ध आहे.
- वैज्ञानिकदृष्ट्या हायमन हा योनीतील पडदा खूप पातळ असतो.
- अनेकदा सायकलिंग, जंपिंग अशासारख्या कसरतींमुळेही तो फाटू शकतो.
- हा पडदा केवळ लैंगिक संबंधांमुळे फाटतो असे समजेणे चुकीचे आहे.
- त्यामुळे तसे करणे हे अवैज्ञानिक देखील आहे आणि तज्ज्ञांचे मत आहे की बलात्कार झाला आहे की नाही हे शोधणे कठीण आहे.
महिला अधिकाऱ्याला दुहेरी वेदना…आधी बलात्कार, नंतर टू फिंगर टेस्ट!
- सध्या चर्चेत असलेल्या वायुसेनेच्या बाबतीत, महिला अधिकाऱ्याने वायुसेना प्रशासकीय महाविद्यालयाच्या आवारात तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार केली आहे.
- कोईम्बतूर जिल्ह्यात पोलिसांनी यासंदर्भात एफआयआर नोंदवला आहे.
- सध्या आरोपी फ्लाइट लेफ्टनंटला पोलिसांनी अटक केली आहे.
- त्याने स्वतः २५ सप्टेंबर रोजी न्यायालयासमोर शरण आला, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
- पीडितेने सांगितले आहे की, माझ्यासाठी टू फिन्गर टेस्ट घेणे खूप वेदनादायक होते.