मुक्तपीठ टीम
हल्ली ट्विटर युजर्ससाठी नव-नवीन फिचर्स आणत आहे. ट्विटर लवकरच आणखी एक फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे. ३१ ऑगस्ट रोजी ट्विटरने ट्विटर सर्कल हे नवीनतम फिचर ट्विटर युजर्ससाठी रोल आउट केले. त्यानंतर ट्विटर युजर्सना आता एडिट बटणाची सुविधा मिळणार आहे. आता ट्विट केले असेल आणि ते एडिट करता येईल. ट्विटरचे हे फिचर अद्याप चाचणी मोडमध्ये आहे. लवकरच ट्विटर या फिचर्सचा समावेश करेल अशी अपेक्षा आहे.
सर्वाधिक विनंती केलेले फिचर्स…
- ट्विटरने गुरुवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत युजर्सना त्यांचे ट्विट एडिट करण्याची परवानगी देण्यासाठी ते एडिट बटणावर काम करत असल्याची माहिती दिली.
- जर सर्व काही ठीक झाले तर लवकरच लोकांना ही सुविधा मिळेल.
- हे आतापर्यंतच्या सर्वाधिक विनंती केलेल्या फिचर्सपैकी एक आहे.
एडिट बटन ट्रायल मोडवर…
- मेसेज एडिट करण्यासाठी ट्विटर सध्या ट्रायल मोडवर आहे.
- कंपनीने एक ब्लॉग पोस्ट केला आहे की ते ट्विट एडिट फिचरची अंतर्गत चाचणी करत आहे.
- चाचणीचे सकारात्मक परिणाम आल्यास या महिन्याच्या अखेरीस ‘प्रीमियम ट्विटर ब्लू’ सेवेच्या ग्राहकांना ते आणण्याची योजना आहे.
पोस्ट केल्यानंतर ३० मिनिटांच्या आत एडिट करा…
- ‘एडिट’ फिचर युजर्सना ट्विट पोस्ट केल्यानंतर चुक सुधारण्यासाठी व हॅशटॅग जोडण्यासारखे बदल करण्यासाठी ३० मिनिटे देईल.
- ट्विटमध्ये बदल केला गेला आहे की नाही हे स्पष्ट करण्यासाठी युजर्सना ठराविक वेळेसह लेबल आणि चिन्ह दिसेल.
- युजर्स लेवलवर ‘टॅप’ करून ट्विट्सच्या मागील आवृत्त्या पाहण्यास सक्षम असतील.
- संभाव्य समस्या ओळखण्यात आणि त्यांचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी युजर्सच्या लहान ग्रुपसह ‘एडिट’ फिचरची चाचणी करत आहे.