मुक्तपीठ टीम
ट्विटरने भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू’चे खाते निलंबित केले आहे. @kooeminence हे ट्विटर हँडल, जे युजर्सच्या प्रश्नांसाठी बनवले होते ते आता शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी, ट्विटरने न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन आणि वॉशिंग्टन पोस्टसह अनेक प्रमुख जागतिक पत्रकारांची खाती निलंबित केली होती. कू चे ट्विटरवरील अकाऊंट संस्पेंड केल्यामुळे ‘कू’ च्या संस्थापकांचा एलॉन मस्क यांच्यावर राग अनावर झाला आहे.
कोणतीही कल्पना न देता हँडल निलंबित असे का?
- हँडल ला निलंबित का करण्यात आले हे माहित नाही.
- कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
- त्यांनी ‘ट्विटरवर कुच्या हँडलवर बंदी घातली आहे.
- त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली
- हँडल ला निलंबित करण्यामागे एकच कारण ते म्हणजे की कू ट्विटरशी स्पर्धा करतो?
- तर? मस्तोडॉनलाही आज बंद करण्यात आले आहे.
- हे कोणत्या प्रकारचे फ्रि स्पिच आहे आणि आपण कोणत्या जगात राहत आहोत? इथे काय होत आहे? असा प्रशन कू चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी राधाकृष्ण यांनी एलॉन मस्क यांना विचारला आहे.
कु जगातील दुसरी सर्वात मोठी मायक्रोब्लॉगिंग साइट!
- कू जगातील दुसरे सर्वात मोठे मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म बनले आहे.
- युजर्सची संख्या ५० दशलक्ष ओलांडली आहे.
- भारताव्यतिरिक्त, कु अॅप सध्या अमेरिका, युनायटेड किंगडम, सिंगापूर, कॅनडा, नायजेरिया, यूएई, अल्जेरिया, नेपाळ आणि इराणसह २०० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे.
- कु १० भाषांमध्ये उपलब्ध आहे.
- कु हे नेटिव्ह मायक्रो-ब्लॉगिंग अॅप म्हणून मार्च २०२० मध्ये लाँच केले गेले होते.
- Bombinet Technologies Pvt Ltd, बंगळुरू यांनी कू बनवले आहे.
- हे अॅप भारताचे स्वतःचे अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिडवतका यांनी डिझाइन केले आहे.
ट्विटर जगातील पहिली सर्वात मोठी मायक्रोब्लॉगिंग साइट!
- ट्विटरचे २२० दशलक्ष सक्रिय युजर्स आहेत.
- याचे अमेरिकेत ७६ दशलक्ष आणि भारतात २३ दशलक्ष युजर्स आहेत.
- जगभरात दररोज सुमारे ५०० दशलक्ष ट्विट केले जातात.
- ट्विटर जुलै २००६ मध्ये सुरू झाले.
- त्याची स्थापना जॅक डोर्सी, नोहा ग्लास, इव्हान विल्यम्स आणि बिझ स्टोन यांनी केली होती.