Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कच्च्या तेलाच्या किमती घटल्याने पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करावेत

युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांची पेट्रोलियम मंत्र्यांकडे मागणी

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Prathamesh Abnave

मुक्तपीठ टीम

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल  १२९ डॉलर वरून ७६ ते ८० डॉलर इतक्या घटल्या आहेत. त्यामुळे भारतात पेट्रोल व डिझेलचे भाव त्वरित कमी करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी केली. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवून आबनावे यांनी ही मागणी केली आहे. सदर निवेदन त्यांनी पंतप्रधान कार्यालय, तसेच अर्थमंत्रालयालाही पाठवले आहे.

प्रथमेश आबनावे म्हणाले, “कच्च्या तेलाचे भाव सातत्याने खाली येत आहेत. गेल्या एका महिन्यातच जवळपास २० टक्क्यांनी हे भाव कोसळले आहेत. मार्च २०२२ मध्ये कच्च्या तेलाचे भाव १२९ डॉलर प्रति बॅरल होते. ते आता ७६ ते ८० डॉलर प्रति बॅरल इतके खाली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलातील किमतीमध्ये झालेल्या घसरणीचा फायदा म्हणून भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन त्वरित इंधन दरात कपात करावी.”
कच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात जूनपासून घसरत असल्याने त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना व्हायला हवा, कमी झालेल्या किमतींची आधारभूत किंमत आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडली असल्यास इंधन दरकपात का झाली नाही, याची चौकशी करावी. पेट्रोलियम मंत्री म्हणून यासंदर्भात आपण काय कार्यवाही केली? वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या किमती काही निवडक लोकांच्या फायद्यासाठी ठेवल्या आहेत का? यामध्ये काही हितसंबंध गुंतलेले आहेत का, याची चौकशी करावी आणि यासंदर्भात जनतेला स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही आबनावे यांनी निवेदनात केली आहे.

Tags: Cruide OilMaharashtraPetrol dieselमहाराष्ट्र
Previous Post

महिंद्रा महाराष्ट्रात पुण्यामध्ये ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लान्ट उभारणार

Next Post

ट्विटर X कू : ट्विटरवरील अकाऊंट संस्पेंड होताच ‘कू’ संस्थापकांचा एलॉन मस्क यांच्यावर हल्लाबोल!

Next Post
Twitter And Koo

ट्विटर X कू : ट्विटरवरील अकाऊंट संस्पेंड होताच 'कू' संस्थापकांचा एलॉन मस्क यांच्यावर हल्लाबोल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!