मुक्तपीठ टीम
ट्विटरला टक्कर देण्यासाठी सरसावलेल्या ‘‘कू’’ या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ॲपने १८ महिन्यांमध्ये एक कोटी डाउनलोडचा टप्पा पार केला आहे. या प्लॅटफॉर्मवर काही मोठे अभिनेते, नामांकित खेळाडू जोडले गेले आहेत. त्यांना आपल्या भारतीय भाषांमध्ये आपल्या फॅन्ससोबत कनेक्ट राहणे जास्त आवडत आहे. एक कोटीच्या टप्प्याबद्दल यातील अनेक सेलिब्रिटी यूजर्सनी ‘‘कू’’ला शुभेच्छाही दिल्या आहेत.
अभिनेत्री लारा दत्ताने ‘कू’ला शुभेच्छा देताना एक व्हिडिओ सादर केला आहे. ही पोस्ट तिने आपल्या ऑफिशियल अकाउंट @laradutta वर केली आहे. या शिवाय अभिनेता आशिष विद्यार्थी, सौंदर्य शर्मा, डेलनाज़- बख्तयार ‘कू’वर आपले व्हिडीओ पोस्ट करून शुभेच्छा दिल्या आहेत.
‘कू’ ॲप बद्दल सर्व काही…दीड वर्षात एक कोटी!
- ‘‘कू’’’ ॲप ची सुरुवात मार्च २०२० मध्ये भारतीय भाषांमध्ये मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या रूपामध्ये झाली.
- भारतीय भाषांमध्ये उपलब्ध या ॲपवर भारतातील विभिन्न क्षेत्रांमधील लोक आपल्या मातृभाषेत आपले विचार व्यक्त करू शकतात.
- फक्त १०% लोकांना चांगलं इंग्लिश बोलत येतं, त्या देशात भारतीय भाषांमधील भारतीय सोशल सोशल मीडिया खूप मोठी गरज आहे.
- अशा माध्यमात भारतीय यूजर्स त्यांच्या भाषांमध्ये अभिव्यक्त होऊ शकतात.
- ‘कू’ हा भारतीय आवाज बुलंद करण्यासाठीचा भारतीय भाषा आवडणाऱ्यांसाठीचा भारतीय मंच आहे.