Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ट्विटरवर प्रतिगामी विचारसरणींच्या ट्वीट्सना अधिक प्राधान्याचा दावा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
twitter (3)

मुक्तपीठ टीम

सध्याच्या काळात सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. सोशल मीडियाचा वाढता वापर हा सामान्यांच्या जीवनांवर प्रभाव टाकत असतो. त्याचा फायदा घेण्यास राजकारण्यांसह हितसंबंधितांनी सुरुवात केली असल्याचे आरोप होत असतात. आता मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरचा अल्गोरिदम हा डाव्या विचारसरणीपेक्षा प्रतिगामी विचारसरणी अधिक प्राधान्य देणारा असल्याचे एका संशोधनातून उघड झाले आहे. संशोधन करणाऱ्या कंपनीचे म्हणणे आहे की, त्यांनी ट्विटरचे अल्गोरिदम कसे कार्य करते याचा अभ्यास केला. हे समोर आले की, ट्विटरवर यूजर्समधील प्रतिगामी विचारसरणीच्या राजकीय पक्षांच्या ट्विट्सची शिफारस जास्त केली जाते.

 

ट्विटर अल्गोरिदम तपासण्यासाठी सात देशांचा अभ्यास

  • सोशल मीडिया जायंटने हा अभ्यास जगातील सात देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिकेवर केला आहे.
  • या देशांच्या राजकीय पक्षांनी ट्विटरवर शेअर केलेल्या सामग्रीची १ एप्रिल २०२० ते १५ ऑगस्ट दरम्यान तपास करण्यात आला.
  • यामध्ये असे दिसून आले की ट्विटरचे अल्गोरिदम कोणत्या ट्वीट्सला सर्वाधिक प्रोत्साहन देत आहे.
  • डाव्या विचारसरणीच्या पक्षांपेक्षा मुख्य प्रवाहातील प्रतिगामी विचारसरणी पक्षांच्या ट्विटला अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे.

 

असं का घडतं, ते शोधण्याचा ट्वविटरचाही प्रयत्न!

  • ट्विटर मेटा टीमचे संचालक रुम्मन चौधरी यांनी सांगितले की, आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की यामागचे कारण काय आहे?
  • पुरोगमी विचारसरणीच्या पक्षांच्या तुलनेत प्रतिगामी विचारसरणीच्या पक्षांचे ट्विट अल्गोरिदमिकमुळे जास्त पुढे जात असल्याचे समोर येत आहे.
  • ” मात्र, सध्या या प्रश्नांची उत्तरे देणे खूप कठीण आहे, असे ते म्हणाले.

 

पक्षपातीपणाचे आरोप यापूर्वीही झाले!

  • ट्विटच्या अल्गोरिदमवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
  • याआधी एप्रिलमध्ये, एका अभ्यासातून असेही समोर आले होते की, ट्विटर काळ्या लोकांपेक्षा पांढऱ्या आणि तरुण चेहऱ्यांना अधिक प्राधान्य देते.

 

ट्विटरने धोरण बदलले

  • संशोधनात असे समोर आले आहे की जेव्हा एका चित्रात दोन चेहरे असतात, तेव्हा पूर्वावलोकनासाठी, ट्विटर दोन्हीमध्ये तुलनेने योग्य असलेले फोटो निवडते.
  • यानंतर ट्विटरने आपले धोरण बदलले आणि म्हटले की यूजर्सनी त्यांचे फोटो स्वतः संपादित केले तर चांगले आहे.

Tags: twittertwitter algorithmट्विटरट्विटर अल्गोरिदम
Previous Post

“शाळांच्या पायाभूत सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या उद्दिष्टावर भर”

Next Post

फळपीक विम्यातील केंद्राचा हिस्सा तातडीने देण्याची मागणी

Next Post
dadaji bhuse-narendra singh tomar

फळपीक विम्यातील केंद्राचा हिस्सा तातडीने देण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!