मुक्तपीठ टीम
टीव्हीएसच्या Raider 125 बाईकने लाँच होताच लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते तिच बाईक आता नवीन अवतारात लाँच होणार आहे. कंपनी सी बाईक एका नवीन अवतारात लाँच करणार आहे. टीव्हीएस येत्या एक ते दोन दिवसात अपडेटेड Raider 125 ही बाईक भारतीय बाजारात लाँच करू शकते. यात काही नवीन फिचर्सचाही समावेश आहे.
अपडेटेड TVS Raider 125 मध्ये काय आहे खास?
- यात अनेक कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत.
- यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचर दिले आहे.
- जीपीएस आणि कॉलिंग सारख्या सुविधाही आहे.
- या बाईकच्या टॉप स्पेस वेरिएंटमध्ये TFT डिस्प्ले आहे.
- बाईकमध्ये १२५ सीसी इंजिनचा वापर केला आहे.
- हे इंजिन ११.४ बी एच पी पॉवर आणि ११.२ एन एम पीक टॉर्क जनरेट करते.
- या बाईकचे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
- यात पॉवर आणि इको सारखे राइडिंग मोड देण्यात आले आहे.
- या बाईकची सुरुवातीची किंमत १ लाख रुपयांपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे.