स्वप्निल लोणकरमागोमाग पुण्यातच आणखी एका तरुण अमर मोहितेनं आपलं जीवन संपवलं. त्याची निवडही झाली होती. पण मराठा आरक्षण रद्द झालं आणि अमरची फिजिकलची संधी हुकली. त्यामुळे निर्माण झालेला संताप, व्यक्त होणारं दु:ख हेलावून टाकणारं.
गुणवंत, मेहनती पण व्यवस्थेनं मार्ग रोखलेल्या तरुणांमधील वाढतं नैराश्य हे अस्वस्थ करणारं. सरकारनं जागावं! तरुणाईचं नैराश्य आज स्वत:ला संपवतेय. उद्या सत्तेला संपवेल.
तरुणाई नैराश्यात लोटली जावू नये. यासाठी विद्यार्थी नेत्यांकडून व्यथा-वेदना उघड करतानाच, जाणत्यांकडून पर्यायी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न:
रडायचं नाही, लढायचं! जिंकायचं!!
मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे यांनी विद्यार्थी नेते, शिक्षक, स्टार्ट अप मार्गदर्शक, वकील, माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत त्यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्रातील तरुणाईला देण्याचा प्रयत्न केला आहे.