मुक्तपीठ टीम
सध्या इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढली आहे. मात्र चारचाकी वाहनांचा वाढता वापर, इंधन दरवाढ, वायू प्रदूषणाची समस्या लक्षात घेता अमेरिकेनंतर आता भारतातही इलेक्ट्रिक कारला वाढती मागणी आहे. तसे पर्यायही उपलब्ध होत आहेत. पण, सर्वांना सतावते ती कार चार्जिंगची समस्या. त्यामुळे अमेरिकेची इलेक्ट्रिक वाहन कंपनी ट्रायटनने या समस्येवर उपाय शोधला आहे. ट्रायटन भारतात आपली मॉडेल एच इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करत आहे. या इलेक्ट्रिक कारचं वैशिष्ट्य म्हणजे ती एकदा चार्ज केली की १२०० किमीपर्यंत चालवता येईल.
Check out our new sedan- THE MODEL N4 for the India Market. MSRP will start Rs.35 Lakh@PMOIndia @narendramodi @SunielVShetty @Sunil_Gavaskar @HimanshuB_Patel pic.twitter.com/DjG4zfsPiN
— Triton EV (@realtritonev) January 11, 2021
काय आहेत एच एसयूव्हीची वैशिष्ट्ये?
- २ तासात पूर्ण चार्ज, १२०० किमी रेंज
- एसयूव्ही २००kWh बॅटरी पॅकमधून पॉवर काढते. ज्यामध्ये हायपरचार्जचा पर्याय आहे.
- ट्रायटन ईव्हीचा दावा आहे की, इलेक्ट्रिक एसयूव्ही केवळ दोन तासात हायपरचार्जरद्वारे पूर्णपणे रिचार्ज केली जाऊ शकते.
- पूर्णपणे चार्ज केल्यानंतर ती सुमारे १२०० किमी चालवता येते.
- ही कार ०-१०० kmph चा वेग फक्त २.९ सेकंदात पकडू शकते.
- अशा श्रेणीसह ही देशातील आणि जगातील पहिली इलेक्ट्रिक कार असेल.
- ट्रायटन मॉडेल एच एसयूव्ही ७ रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केली जाईल.
- ट्रायटन कारची लांबी ५,६९० मिमी, उंची २,०५७ मिमी आणि रुंदी १,८८० मिमी आहे.
- व्हीलबेस सुमारे ३,३०२ मिमी आहे.
- गाडीची लांबी १८ फूटांपेक्षा जास्त आहे.
- कारला मोठा चंकी फ्रंट फेस आणि मोठं ग्रिल मिळेल.
- या एसयूव्हीमध्ये ८ जण सहज बसू शकतील.
- कंपनीचा दावा आहे की ते ५,६६३ लिटर (२०० क्यूबिक फूट) पर्यंतचे सामान सहज साठवू शकते.
कंपनीचा पहिला प्लांट तेलंगणात
- कंपनीने स्पष्ट केलं आहे की, भारताकडून २.४ अब्ज डॉलर (सुमारे १८,००० कोटी रुपये) ची खरेदी ऑर्डर आधीच मिळाली आहे.
- कंपनी लवकरच तेलंगणातील जहिराबाद भागात आपले उत्पादन युनिट सुरू करण्याची योजना आखत आहे.
- येत्या काही महिन्यांत त्यांची $ ३०० दशलक्ष गुंतवणूक होईल.
- भारताबरोबरच कंपनी बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमध्येही कारचं उत्पादन घेणार आहे.