उदयराज वडामकर / कोल्हापूर
काळाच्या पुढची पावलं उचलत रयतेसाठी कल्याणकारी राज्य चालववणारे राजे म्हणजे शाहू महाराज. त्यांच्या जयंती निमित्त
कोल्हापुरात लोकोत्सव साजरा झाला. कोल्हापूरमधील मिरजकर तिकटी येथे राजर्षी शाहू महाराजांची तीस फूट उंचीची भव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे. त्यांना मानवंदना देण्यासाठी शाहीर डॉ. राजू राऊत यांनी पोवाडेही सादर केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना मानाचा मुजरा!
सर्वपक्षीय राजश्री शाहू जयंती लोकोत्सव कोल्हापूरमध्ये साजरा होत आहे. २६ जूनला या लोकराजाची जयंती. त्यामुळे त्या दिवशीच नव्हे तर आधी आणि नंतरही राजांच्या कार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी कोल्हापूरकरांनी त्यांना साजेशा विविध कार्यक्रमांचा समावेश असणाऱ्या लोकोत्सवाचे आयोदन केले. त्यासाठी खास प्रयत्न करण्यात आले.
महाराजांच्या भव्य प्रतिमेसमोर पोवाड्यानं जागवला जोश
कोल्हापूर मिरजकर तिकटी येथे राजश्री शाहू महाराज ची तीस फूट उंचीचे भव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे. मिरजकर तिकटी येथे राजषि शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम साजरा केला. सुप्रसिद्ध शाहीर डॉ. राजू राऊत यांनी पोवाडे सादर केले. शाहू महाराजांच्या कार्याचे महात्म्य मांडताना त्यांचं जोशातील सादरीकरण उपस्थितांच्या ह्रदयाला भिडणारं होतं.
जयंती दिनी मंत्र्यांकडून लोकराजांना मानाचा मुजरा
कोल्हापूर मध्ये लोकराजा राजर्षि शाहू महाराजांची १४८ वी जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त कोल्हापूर येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
एकत्रित सोहळ्यातून मानवंदना
राजर्षी शाहू जयंती सोहळ्यात शाहूनगरीत प्रत्येक नागरिक राजकीय पक्ष, संस्था ,संघटना तालीम, मंडळाने कर्तव्य भावनेने सहभागी होऊन सोहळा अभूतपूर्व बनवण्यासाठी प्रयत्न केले.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करण्यासाठी इरिगेशन फेडरेशनचे संचालक मंडळ व राजर्षी शाहू महाराज लोकोत्सव समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कोल्हापूर जिह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती लोकसहभागातून साजरी करण्यात आली. त्यासाठी इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने खास प्रयत्न केले.
राजर्शी शाहूंचे कोल्हापूरवरील उपकार अफाट…
- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचाराचा वारसा सामान्य जनतेमध्ये रुजवला.
- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शेतकरी समृद्ध व्हावा म्हणून राधानगरी धरण बांधले.
- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांच्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून सर्व जातीधर्माची वसतिगृहे निर्माण केली.
- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून कोल्हापूरमध्ये बाहेरील राज्यातील व्यापाऱ्यांना आणून शेतीमालाच्या खरेदी विक्रीची व्यापारपेठ निर्माण केली. आजही राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यांच्या कामातून जिवंत असल्याचे कोल्हापुरात जाणवते.