Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राहुल बजाज श्रद्धांजली: भारतीय औद्योगिक विकासाला गती देणारे व्यक्तिमत्व हरपले!

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची राहुल बजाज यांना आदरांजली

February 12, 2022
in घडलं-बिघडलं
0
Rahul Bajaj

मुक्तपीठ टीम

बजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष राहुल बजाज यांच्या निधनामुळे भारतीय औद्योगिक विकासाला गती देणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे अशा शोकभावना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज व्यक्त केल्या आहेत.

 

जयंत पाटील यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे की, भारतीय औद्योगिक विश्वाला विशेषतः ऑटो उद्योगाला स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि औरंगाबाद येथील उद्योग विश्वाची भरभराट करण्यात आणि या शहरांच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी विकसित केलेल्या अनेक वाहनांमुळे सामान्य माणसांच्या आशा आकांक्षां पूर्णत्वास गेल्या.

 

भारताला स्वयंचलित दुचाकी वाहन उद्योग क्षेत्राला नव्वदच्या दशकात स्वतंत्र ओळख मिळाली. यामध्ये राहुल बजाज यांच्या नेतृत्वाखालील बजाज कंपनीचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जमनालाल बजाज यांचा देश सेवेचा वारसा जपला. त्यांनी समाजातील दुर्बल वर्गासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांना मदतीचा हात देऊन सामाजिक भान जोपासले, असे जयंत पाटील यांनी संदेशात नमूद केले आहे.


Tags: MaharashtrapuneRahul Bajajपुणेमहाराष्ट्रराहुल बजाज
Previous Post

राहुल बजाज श्रद्धांजली: सामाजिक भान असलेला भारतीय उद्योग क्षेत्रातील पितामह हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

राहुल बजाज श्रद्धांजली: जगातील उद्योग जगतात पुण्याचे नाव मोठे करणारे सहृदयी उद्योजक हरपले – डॉ नीलम गोऱ्हे

Next Post
Rahul Bajaj

राहुल बजाज श्रद्धांजली: जगातील उद्योग जगतात पुण्याचे नाव मोठे करणारे सहृदयी उद्योजक हरपले - डॉ नीलम गोऱ्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!