Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भर पावसात पारंपारिक तारपा नृत्य स्पर्धा रंगली, पोलिसांविषयी आपुलकी अधिकच वाढली!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Tarpa Dance Competition

गौरव संतोष पाटील / पालघर

खाकी वर्दीतील माणूसपण जेव्हा संवेदनशीलतेनं समोर येतं तेव्हा सामान्य माणसांची पोलीस दलाविषयी आपुलकी वाढते. पालघर पोलिसांनी सध्या राबवलेल्या जनसंवाद यात्रा या उपक्रमात पारंपारिक तारपा नृत्य स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेला २८पेक्षा जास्त संघांचा मिळालेला प्रतिसाद हा वाढती आपुलकी दाखवणाराच आहे.

Tarpa Dance Competition

पालघर हा आदिवासींची संख्या जास्त असलेला जिल्हा. दुर्गम भागातील डोंगररांगांमध्ये वसलेल्या पाड्यांवर राहणारे आदिवासी आपली संस्कृती परंपरा जपून आहेत. सध्या पालघर पोलीस दलामार्फत सर्वच स्तरांतील नागरिकांना जोडण्यासाठी ग्रामीण भागात जनसंवाद यात्रा सुरू आहे. या यात्रेचा एक भाग म्हणून तारपा या पारंपरिक नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

 Tarpa Dance Competition

पोलिसांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत २८पेक्षा जास्त संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. तारपा हे पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केलं करत रंगत वाढवली. या उपक्रमात पालघरच्या ग्रामीण आदिवासी भागात असलेल्या अनैतिक रूढी परंपरा, बालविवाह, पोक्सो, वाहन चालवताना घ्यायची काळजी, अफवांवर विश्वास ठेवू नये अशा विविध विषयांची माहिती देत जनजागृती करण्यात आली . पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेच आयोजन करण्यात आलं असून नृत्य स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघाला दहा हजार रुपये , द्वितीय सात हजार रुपये , तर तृतीय पाच हजार रुपयांच पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं .

विशेष म्हणजे कासा येथे तारपा नृत्य स्पर्धेत केवळ आदिवासी बांधवच नाही तर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनीही आपल्या सहकाऱ्यांबरोबर तारपा नृत्यावर ताल धरला.

Tarpa Dance Competition

जनसंवाद अभियान अंतर्गत तारपा नृत्य स्पर्धा पुरस्कार

  • प्रथम क्रमांक
    आदिवासी क्रांतिवीर राघोजी बांगरे कला पथक शेनसरी ता. डहाणू
  • द्वितीय क्रमांक
    गावदेवी तारपा नृत्य साखरशेत ता. जव्हार जि. पालघर
  • तृतीय क्रमांक
    ओसरवीरा तारपा नृत्य डहाणू

 Tarpa Dance Competition

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsmuktpeethPalgharPalghar PoliceTarpa Dance CompetitionTraditional Dancetribal traditionsआदिवासी परंपराघडलं-बिघडलंचांगली बातमीतारपा नृत्य स्पर्धापारंपारिक नृत्यपालघरपालघर पोलीसमुक्तपीठ
Previous Post

भाजपाकडून केजरीवालांना अण्णा हजारेंच्या ‘त्या’ उद्गारांची आठवण!

Next Post

अशक्य नसतंच काही! एका तपाच्या संघर्षानंतर गोपिका बनली केरळची पहिली आदिवासी हवाईसुंदरी!

Next Post
Gopika Govind

अशक्य नसतंच काही! एका तपाच्या संघर्षानंतर गोपिका बनली केरळची पहिली आदिवासी हवाईसुंदरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!