Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हिस्टाडोम कोचमधून ५० हजार प्रवाशांनी लुटला मुंबई – गोवा मार्गावर निसर्ग सौंदर्याचा आनंद

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Vistadom Coach

मुक्तपीठ टीम

मध्य रेल्वेवरील व्हिस्टा डोम डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. मुंबई – गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची श्वास रोखून धरणारी दृश्ये असोत किंवा मुंबई – पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची विलोभनीय दृश्ये असोत, वरून काचेचे छप्पर आणि रुंद खिडक्यांसह हे डबे लोकप्रिय सिद्ध झाले आहेत. नऊ महिन्यात तब्बल ५० हजार प्रवाशांनी या मार्गावर निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटला.

ऑक्‍टोबर- २०२१ ते २३ मे २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेने ४९,८९६ प्रवाशांची नोंदणी करून रु.६.४४ कोटी महसूल मिळवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस १००% पेक्षा जास्त म्हणजेच १८,६९३ प्रवासी वाहतूकीतून रु. ३.७० कोटी उत्पन्नाची नोंद करून आघाडीवर आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीनने अप दिशेने म्हणजे पुणे ते मुंबई प्रवासात रु. १.६३ कोटींच्या उत्पन्नासह ९९% वहिवाट (ऑक्युपंसी) नोंदवली आहे आणि १००% वहिवाट (ऑक्युपंसी) असलेल्या डेक्कन एक्सप्रेसमधून १६,४५३ प्रवासी वाहतूकीतून रु. १.११ कोटी महसूल प्राप्त झाला आहे.

 Vistadom Coach

मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये २०१८ मध्ये विस्टाडोम कोच पहिल्यांदा जोडण्यात आला होता. या डब्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे दि. २६.६.२०२१ पासून मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये सादर करण्यात आले. प्रवाशांच्या प्रचंड मागणीमुळे, मुंबई – पुणे मार्गावरील दुसरा विस्टाडोम कोच दि. १५.८.२०२१ पासून डेक्कन क्वीनला जोडण्यात आला.

विस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट्स आणि पुशबॅक खुर्च्या, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, मल्टिपल टेलिव्हिजन स्क्रीन, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स यांसारखी अनेक असामान्य वैशिष्ट्ये आहेत. दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे, सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट याशिवाय व्ह्यूइंग गॅलरी सुद्धा यात आहे.

 

 


Tags: Central Railwaygood newsmuktpeethMumbai - Goa MargNature BeautyVistadom Coachचांगली बातमीनिसर्ग सौंदर्यमध्य रेल्वेमुक्तपीठमुंबई - गोवा मार्गव्हिस्टाडोम कोच
Previous Post

राज्यात ५२९ नवे रुग्ण, ३२५ बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Next Post

महाराष्ट्राला ऊर्जा श्रेणीमध्ये ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवॉर्ड’

Next Post
Star of Governance-Skoch Award

महाराष्ट्राला ऊर्जा श्रेणीमध्ये ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवॉर्ड’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!