Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यूपीआयमार्फत मोबाईल नंबरद्वारे एक लाखापर्यंत रक्कम पाठवता येणार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
gnm (24)

मुक्तपीठ टीम

यूपीआयद्वारे पैसे पाठवणे आता अददी सोपे होत आहे. आतापर्यंत बँक खाते, यूपीआय आयडी वगैरेची गरज असे. आता मात्र फक्त मोबाइल नंबरचा वापर करुन थेट पैसे पाठवता येणे शक्य आहे. सध्या काही बँकांनी तशी सेवा सुरु केली आहे. लवकरच अन्य बँकाही तशी सुविधा देणार आहेत. त्यामुळे एक लाखापर्यंतची रक्कम झटपट पाठवणे आता सहज शक्य होणार आहे.

 

आपल्याला मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला पैसे पाठविण्यासाठी, त्यांच्याविषयीची बरीच माहिती आवश्यक असते. यूपीआय अॅपमधून पैसे पाठविण्यासाठी आपल्याकडे मित्राची किंवा कुटूंबातील सदस्याचे बँक खाते किंवा यूपीआय आयडी माहिती असणे आवश्यक असे. परंतु, यापुढे ही माहिती आवश्यक नाही. आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँकेने ‘पे टू कॉन्टॅक्ट’ किंवा ‘पे युअर कॉन्टॅक्ट’ सुरू केले आहे. ही सुविधा सुरू झाल्यावर, आता आपण फक्त मोबाइल नंबरद्वारे मित्र किंवा नातेवाईकांना पैसे पाठवू शकाल. यूपीआयमार्फत पैसे पाठवणे अधिक सुलभ झाले आहे. इतर बँकाही येत्या काही दिवसांत ही सुविधा सुरू करतील. सध्या एक लाखापर्यंत रक्कम पाठवणे शक्य आहे.

 

असे पाठवा झटपट पैसे…

  • या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, पाठवणाऱ्यास बँकेचे अ‍ॅप उघडावे लागेल आणि प्रथम “पे टू कॉन्टॅक्ट” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर मोबाइल फोनबुक उघडेल. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीला संपर्कातून निवडता येईल.
  • हे केल्याने, बँकेच्या अ‍ॅपला संपर्काचा यूपीआय पत्ता आपोआप सापडेल.
  • यानंतर पाठवणाऱ्यास फक्त यूपीआय तपासण्याची गरज असेल.
  • रक्कम टाकावी लागेल, पासवर्ड प्रविष्ट केल्यानंतर पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील.
  • पैसे प्राप्त करणारी व्यक्ती कोणत्याही अ‍ॅपवर असू शकते – फोनपे, गुगल पे किंवा पेटीएम.
  • बँकेचे अ‍ॅप स्वयंचलितपणे यूपीआय पत्ता शोधेल.

 

बँकांच्या मते, यूपीआयमध्ये नवीन सुविधा सुरू झाल्यावर, पेमेंटची प्रक्रिया करण्यासाठी यूपीआय आयडी किंवा बँक खात्याचा तपशील भरण्याची आवश्यकता नाही आणि वेळ वाचेल. तसेच, आता पैसे हस्तांतरित करणे देखील सोपे झाले आहे. या सुविधेअंतर्गत कोटक महिंद्रा बँकेचे ग्राहक दररोज ५०,००० आणि आयसीआयसीआय बँकचे ग्राहक १ लाख रुपये हस्तांतरित करू शकतात.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: pay to contactpay your contactUPIआयसीआयसीआय बँकएअरटेल पेमेंट्स बँककोटक महिंद्रा बँकपे टू कॉन्टॅक्टपे युअर कॉन्टॅक्टयूपीआय
Previous Post

ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर…२४ तासात १ लाखाहून अधिक बुकिंग!

Next Post

मुंबईत पोस्ट खात्यात संधी, मेल मोटर सर्व्हिसमध्ये ड्रायव्हर्स पाहिजेत

Next Post
gnm (23)

मुंबईत पोस्ट खात्यात संधी, मेल मोटर सर्व्हिसमध्ये ड्रायव्हर्स पाहिजेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!