Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हीआयपी वेड! ८० हजाराची स्कुटी, १५ लाख ४४ हजाराची आरटीओ नंबरसाठी!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Chandigarh RLA

मुक्तपीठ टीम

चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला! आपण अनेकदा सहजच असं बोलतो आणि ऐकतोही. व्हीआयपी नंबरसाठी जो खर्च केला जातो तो ऐकून असंच म्हणाल. आता चंदीगडचे व्यापारी ब्रिजमोहन यांचं पाहा. त्यांनी एक्टिव्हा स्कुटी घेतली ती ८० हजारात. पण त्यांच्या ८० हजाराच्या स्कूटीसाठी व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी त्यांनी चक्क १५ लाख ४४ हजार खर्च केले.

 

चंदिगडमधील परिवहन विभागाने आयोजित केलेल्या लिलावात व्हीआयपी नंबर CJ-0001 खरेदी केला. या नंबरची किमान किंमत ५० हजार रुपये ठरवण्यात आली होती. व्हीआयपी नवीन मालिकेसाठी चंदीगडमध्ये बोली लावण्यात आली होती. ब्रिजमोहन म्हणाले की, जेव्हा मी पहिल्यांदा नंबरसाठी अर्ज केला तेव्हा मला वाटले की व्हीआयपी नंबर असावा. मला चंदीगडचा 0001 नंबर पाहिजे होता. ब्रिजमोहन म्हणाले की, छंदाची कधी किंमत नसते.

 

ब्रिजमोहन यांनी स्कूटी नुकतीच ८० हजाराला विकत घेतली होती. आता त्यांनी ठरवलं आहे की, कार घेतली की हा महागडा व्हीआयपी नंबर ते त्यांच्या कारमध्ये ट्रान्सफर करेल. मोहन यंदाच्या दिवाळीत फोर व्हिलर खरेदी करण्याचा विचार करत आहेत. CH01-CH मालिकेतील ‘0001’ क्रमांकाला गेल्या लिलावात २४ लाख ४० हजारांची बोली लागली होती. जी लिलावाच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च बोली होती.

 

CH01-AP मालिकेतील 0001 क्रमांकासाठी सर्वाधिक बोली २०१२ मध्ये २६ लाख ५ हजार रुपये होती. त्याच वेळी, CH01-CJ मालिका ०००२ ला ५ लाख ४६ हजारांची बोली लागली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, CH01-CJ या नवीन मालिकेच्या लिलावादरम्यान एकूण ३७८ नोंदणी क्रमांक आणि मागील मालिकेतील उर्वरित क्रमांकांचा लिलाव करण्यात आला.


Tags: Activa scootyChandigarhVIPएक्टिव्हा स्कुटीचंदीगडव्हीआयपी नंबर
Previous Post

‘हुनर हाट’ प्रदर्शनाचे केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकुर यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

गिरगाव चौपाटीवर ‘दर्शक गॅलरी’तून क्विन्स नेकलेसचं विहंगम दर्शन… मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

Next Post
गिरगाव चौपाटी दर्शक गॅलरी चे मुख्यामंत्र्यांच्या हस्ते लोकर्पण (6)

गिरगाव चौपाटीवर 'दर्शक गॅलरी'तून क्विन्स नेकलेसचं विहंगम दर्शन... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!