मुक्तपीठ टीम
मध्य रेल्वेच्या लोकलना विलंब हा १२ महिने प्रवाशांच्या नशिबी अटळ आहे. यावरुन सोशल मिडीयावर ‘म.रे’वर वारंवार होणा-या टिकेमुळे ‘यात्री मोबाइल अॅप्लिकेशन’वर लोकलच्या थेट लोकेशनची माहिती मिळू शकेल.
हे अॅप दैनंदिन उपनगरीय प्रवाशांसाठी रेल्वे धावण्यासंबंधी माहिती मिळविण्यासाठी आणि प्रवासाचे उत्तम नियोजन करण्यासाठी उपयुक्त साधन आहे. विशेषत: इतर कोणत्याही कारणांमुळे किंवा मेगाब्लॉकमुळे रेल्वे सेवा विस्कळीत होण्याच्या काळात ट्रेन रद्द करणे किंवा विशेष गाड्या चालवल्याबद्दल त्यांना माहिती मिळू शकते.
‘लाइव्ह लोकेशन ट्रॅकिंग’ प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे आणि सुलभ प्रवासाचे उत्तम नियोजन करण्यात मदत करेल, अशी माहिती रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी १३ जुलै रोजी ‘यात्री’च्या या वैशिष्टयांच्या प्रात्यक्षिकवेळी दिली. सर्व उपनगरीय डब्यांवर बसवलेली जीपीएस उपकरणे आणि लोकलचे रिअल टाइम लोकेशन मिळवण्यासाठी विकसित केलेला ‘अल्गोरिदम’ वापरकर्त्यांना नकाशावर थेट ट्रेनचे स्थान पाहण्यास आणि ट्रेनचे चिन्ह हलताना पाहण्यासाठी सक्षम असेल.
डेटा दर १५ सेकंदांनी ‘आॅटो रिफ्रेश’ होतो आणि गाडीचे अपडेट केलेले ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवण्यासाठी वापरकर्त्यांना रिफ्रेश बटण क्लिक करावे लागेल. वापरकर्त्यांना लोकलच्या आगमनाबाबत वेळेवर सूचना मिळतील. ही सुविधा मेन, हार्बर आणि ट्रान्सहार्बर व आणि बेलापूर/नेरुळ – खारकोपर मार्गांवरील गाड्यांच्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.
थेट अपडेट, लोकलचे अपडेट केलेले वेळापत्रक, उपनगरीय गाड्यांचे तिकीट भाडे तपशील, स्त्रोत आणि नियोजित केलेली स्थानके प्रविष्ट करून प्रवासाचे नियोजन, मेल/ एक्सप्रेस ट्रेनची माहिती, प्रवाशाचे स्थळ, ट्रेन आणि पीएनआर स्थिती याची सद्यस्थिती, मुंबई विभाग, मध्य रेल्वेवरील स्थानकांवर स्थानक निहाय सुविधा पाहणे, रेल्वे आणि वैद्यकीय आपत्कालीन क्रमांक, आवडत्या (नियमित) गाड्या आणि मार्गांवर अॅलर्ट सेट करणे, एका टॅपमध्ये ‘एसओएस’साठी रेल्वे आपत्कालीन स्थितीशी संपर्क साधणे, मेट्रो, मोनो, फेरी आणि बस माहिती आणि वेळापत्रक, वापरकर्ते अभिप्राय आणि सूचना देण्यासाठी हे ‘अॅप’ अँड्रॉइड प्लेस्टोअर आणि अॅपल अॅप’ स्टोअरवर उपलब्ध आहे, असे लाहोटी यांनी सांगितले.