मुक्तपीठ टीम
भारतातील पहिली आणि वेगाने वाढणारी इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक कंपनी असलेल्या ‘टॉर्क मोटर्स’ने ‘पीआयटी क्रू’ ही आपली अनोखी मोबाइल सेवा व्हॅन सादर केली आहे. शाश्वत ई-मोबिलिटी साजरी करण्याच्या आजच्या जागतिक ईव्ही दिनानिमित्त ‘टॉर्क’तर्फे ‘पीआयटी क्रू’ सादर करण्याच आला आहे. क्रूची ही व्हॅन ग्राहकांच्या दारात जाऊन त्यांना विक्री आणि विक्रीपश्चात सेवा पुरविणार आहे. ‘पीआयटी क्रू’ हा या ब्रँडच्या ‘एक्सपीरियंस टॉर्क इनिशिएटिव्ह’चा एक भाग आहे. ‘टॉर्क’ मोटरसायकलच्या मालकीचा अनोखा आनंद देणारा हा एक उपक्रम आहे.
या ब्रँडच्या मोटरस्पोर्ट्समधील वारशापासून प्रेरणा घेऊन, ‘क्राटोस’च्या मालकांना सहजता, सोयीस्करपणा आणि मनःशांती देण्याच्या एकमेव उद्देशाने ‘पीआयटी क्रू’ची रचना करण्यात आली आहे. सध्या पुण्यात कार्यरत असणाऱ्या ‘पीआयटी क्रू’ची ही व्हॅन एक कॉम्पॅक्ट शोरूम आणि सर्व्हिस सेंटर म्हणून काम करील. ग्राहकांकडील मोटारसायकलची नियमित देखभाल करण्याची क्षमतादेखील तिच्यात निर्माण करण्यात आली आहे.
‘पीआयटी क्रू’विषयी माहिती देताना ‘टॉर्क मोटर्स’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल शेळके म्हणाले, “यंदाच्या जागतिक ईव्ही दिनानिमित्त आमच्या ग्राहकांसाठी हा स्मार्टपणे डिझाइन केलेला सेवा उपक्रम आणताना आम्हाला आनंद होत आहे. ग्राहकांचे समाधान हा नेहमीच ‘टॉर्क मोटर्स’मध्ये प्राधान्याचा विषय असतो आणि ‘पीआयटी क्रू’ची रचनादेखील याच उद्देशाने करण्यात आली आहे. या उपक्रमातून आम्ही दूरच्या भागात असलेल्या आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचू आणि नेहमी घाईत असलेल्या शहरी ग्राहकांसाठी एक सोयीस्कर उपाय देऊ, याची आम्हाला खात्री आहे. आमच्या ग्राहकांना एक शाश्वत स्वरुपाची विद्युत वाहनाची परिसंस्था उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न आहेत.”
“याशिवाय, भारतभरातील आमच्या येऊ घातलेल्या वितरक भागीदारांसाठी ग्राहकांशी संपर्क साधणारा ‘पीआयटी क्रू ‘हा पहिला बहुउद्देशीय टच पॉइंट असेल. त्यांची शोरूम तयार होत असताना ते या माध्यमातून आपला व्यवसाय सुरू करू शकतात. या विशिष्ट बिझनेस मॉडेलमधून आम्ही आमचे सेवा नेटवर्क वाढवण्याचा, तसेच शहरांमध्ये आमची पोहोच वाढविण्याचा विचार करीत आहोत,” असेही शेळके यांनी सांगितले.
‘टॉर्क मोटर्स’च्या एक ‘पीआयटी क्रू व्हॅन’मधून एकाच वेळी तीन मोटरसायकलींची डिलिव्हरी करता येऊ शकते. तात्काळ आणि अगदी शेवटच्या क्षणातील वाहनाच्या देखभालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या व्हॅनमध्ये सर्व आवश्यक साधने, सुटे भाग आणि इतर वस्तू उपलब्ध असणार आहेत.
जीपीएस आणि वायफाय या सुविधा असलेली ही व्हॅन ‘थर्मली इन्सुलेटेड’ आहे. त्यामुळे तिच्या आतमध्ये तपमानाची पातळी कमी राखता येते. सॉफ्टवेअरमधील कोणतीही त्रुटी शोधण्यासाठी आणि सर्व्हिसिंग करताना मोटरसायकलसाठी आवश्यक अपडेट्स देण्यासाठी ही ‘हाय-टेक व्हॅन’देखील ‘क्लाउड’शी कनेक्टेड आहे. ‘रेसट्रॅक पिट क्रू’च्या अनुभवानुसार ही रचना आहे. ५.४ केडब्ल्यूएच बॅटरी आणि ४००० वॅटचा इन्व्हर्टर यांनी ही व्हॅन सुसज्ज आहे. मोटरसायकलींच्या ‘ऑन-द-स्पॉट चार्जिंग’साठी या व्हॅनमध्ये ७०० वॅटचे दोन चार्जर बसविण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, मोटारसायकलींची ‘ड्राय क्लीनिंग’ आणि ‘पॉलिशिंग’ या व्हॅनमध्ये केले जाऊ शकते. व्हॅनमधील जागेची त्या दृष्टीने विभागणी करण्यात आली असून कार्यालयील कामकाज आणि सर्व्हिसिंगची कामे ही या जागेत केली जाऊ शकतात.
या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत बंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद येथे ‘पीआयटी क्रू’ सादर करण्याचा ‘टॉर्क मोटर्स’चा विचार आहे.
‘टॉर्क मोटर्स’ने या वर्षाच्या सुरुवातीला ‘क्रॅटोस®’ आणि ‘क्रॅटोस®-आर’ ही आपली प्रमुख उत्पादने सादर केली. तेव्हापासूनच कंपनीला तिच्या या स्वदेशी बनावटीच्या इलेक्ट्रिक मोटरसायकलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. असंख्य ग्राहकांनी या मोटरसायकलींसाठी बुकिंग केले आहे. कंपनीने अनोख्या ‘१:१८ स्केल बॉक्स’प्रमाणे ग्राहकांना मोटारसायकली वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. बालपणीच्या आठवणींना यातून उजाळा मिळतो आणि त्या आठवणी येथे उपयोगी पडतात. तुमच्या संदर्भासाठी व्हिडिओची लिंक येथे देण्यात आली आहे.
About Tork Motors Pvt. Ltd.
Tork Motors is India’s first electric motorcycle manufacturer, registered in the year 2006. The brand has a rich and glorious legacy of racing at the ‘Isle of Man and is backed by the Bharat Forge group. Kapil Shelke, the founder of Tork Motors has leveraged his racing experience in making the brand India’s top electric vehicle manufacturer. Tork Motors has filed more than 50 patents and designs under IPR (Intellectual Property Rights bolstering its R&D and cutting-edge technology since its inception. To know more about the company, visit: www.torkmotors.com