Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केरळमध्ये मुलांना टोमॅटो फ्लूची लागण! जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि सुरक्षेचे उपाय…

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Tomato Flu

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या भीतीच्या सावटातून भारत मुक्त होत असतानाच केरळमध्ये नव्या आजाराचा प्रादूर्भाव सुरु झाला आहे. टोमॅटो फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. याची लागण प्रामुख्याने पाच वर्षांखालील मुलांमध्ये दिसत आहे. त्याचा संसर्ग वाढू नये यासाठी कसोशीने प्रयत्न घेतले जात आहेत. लहान मुलांना ग्रासणाऱ्या या आजाराची कारणं, लक्षणं आणि सुरक्षेचे उपाय जाणून घेण्याचा प्रयत्न…

टोमॅटो फ्लूची लागण होण्यामागील कारणं?

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतानुसार, टोमॅटो फ्लूबद्दल अजून फारशी माहिती मिळालेली नाही. यावर अभ्यास सुरू आहे. बहुतांशी पाच वर्षांखालील मुलांना याची लागण होण्याची जास्त भिती आहे.
त्याचवेळी केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी एक निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले, ‘हा आजार इतर मुलांपर्यंत पसरणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. हे खूप संसर्गजन्य आहे. हा फ्लू पाणी, विष्ठा आणि इतर गोष्टी यांच्या थेट संपर्कातून पसरतो.

टोमॅटो फ्लू झाल्यावर आढळणारी लक्षणे

  • डिहायड्रेशन
  • त्वचेवर पुरळ उठणे.
  • त्वचेला जळजळ किंवा खाज सुटणे.
  • टोमॅटोसारखे लाल पुरळ
  • उच्च ताप
  • शरीर आणि सांधे दुखणे
  • सुजलेले सांधे
  • ओटीपोटात पेटके आणि वेदना
  • मळमळ, उलट्या आणि अतिसार
  • खोकला, शिंका येणे आणि सर्दी
  • हाताच्या रंगात बदल
  • कोरडे तोंड
  • अति थकवा

काळजी घेतली तर लक्षणे नियंत्रणात!

‘टोमॅटो फ्लू हा सेल्फ-लिमिटिंग फ्लूचा प्रकार आहे, याचा अर्थ वेळीच योग्य काळजी घेतल्यास लक्षणे नियंत्रणात ठेवता येतात. अशा परिस्थितीत, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना हायड्रेटेड ठेवणे.

टॉमेटो फ्लूपासून कसं राहावं सुरक्षित?

  • संसर्गित मुलाला उकळलेले स्वच्छ पाणी द्या, जेणेकरून तो हायड्रेटेड राहू शकेल.
  • फोड किंवा पुरळांवर खाज येण्यापासून मुलाला प्रतिबंधित करा.
  • घर आणि मुलाच्या आजूबाजूला स्वच्छतेची काळजी घ्या.
  • कोमट पाण्याने आंघोळ करावी
  • संसर्गित मुलापासून अंतर ठेवा
  • सकस आहार द्या
  • याप्रकारची लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Tags: healthInfectious diseasesKeralamuktpeethTomato Fluआरोग्यकेरळटोमॅटो फ्लूमुक्तपीठसंसर्गजन्य आजार
Previous Post

नृसिंहवाडी येथील बहुमजली पार्किंग इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post

काशीतील ज्ञानवापीमधील चार खोल्यांचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण, ५०% काम पूर्ण झाल्याचा दावा

Next Post
Gyanvapi

काशीतील ज्ञानवापीमधील चार खोल्यांचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण, ५०% काम पूर्ण झाल्याचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!