मुक्तपीठ टीम
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तिवसा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निकाल लागले आहेत. हाती आलेल्या निकालात शिवसेना प्रणित शेतकरी सहकार पॅनलने सर्व १३ जागांवर विजय मिळविला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस प्रणित गटाला भोपळा मिळाला असून अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना धक्का बसला आहे. या निवडणुकीसाठी ५४३ सदस्यांनी मतदान केले.
शिवसेना प्रणित शेतकरी सहकार पॅनलचा विजय
- अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात दोन गटाची प्रतिष्ठा पणाला लागलेली तिवसा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक शांततेत पार पडली. या निवडणुकीचे निकला देखील लागले आहेत.
- शिवसेना प्रणित शेतकरी सहकार पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सर्व १३ जागांवर शिवसेना प्रणित शेतकरी सहकार पॅनलचा विजय झाला.
- तर दुसरीकडे काँग्रेस प्रणित गटाला भोपळा देखील फोडता आला नाही.
यशमोती ठाकूर यांच्यासाठी हा मोठा धक्का
- या निवडणुकीत सुरुवातीपासूनच चुरस बघायला मिळत होती.
- निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेची प्रतिष्ठ पणाला लागली होती.
- त्यातच एक महिन्यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने १७ पैकी १२ जागांवर बाजी मारून सत्ता काबीज केली होती.
- त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचे पारडे जड माणण्यात येत होते.
- मात्र शिवसेना प्रणित पॅनलने काँग्रेसला जोरदार धक्का देत, सत्ता काबीज केली आहे.
- मंत्री यशमोती ठाकूर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.