मुक्तपीठ टीम
जीमेल ही गुगलची ईमेल सर्विस आहे जी लोकांना ती वैयक्तिक आणि अधिकृत दोन्ही हेतूंसाठी वापरली जाते. या प्लॅटफॉर्मवर, अनेक मेसेजिंग सेवांसह १५ जीबी पर्यंत मोफत क्लाउड स्टोरेज स्पेस देखील दिली जाते.
अनेकवेळा कामात व्यस्थ असल्यामुळे अनावश्यक मेल्स डिलीट करता येत नाही त्यामुळे क्लाउड स्टोरेज भरते, आणि नवीन मेल मिळण्यात अडचण येऊ शकते. जीमेलमध्ये स्टोरेज वाढवण्याच्या आणि ते क्लिन करण्याच्या सोप्या स्टेप्स जाणून घेऊ…
जीमेलमधल्या लार्ज फाइल्स अशा करा क्लिन…
- सर्वप्रथम, जीमेल अॅप उघडा
- प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा
- यानंतर तुम्हाला क्लाउड आणि स्टोरेज स्पेसचा तपशील दिसेल.
- स्टोरेज स्पेसचे तपशील पाहण्यासाठी तुम्ही क्लाउड आयकॉनवर क्लिक करा.
- स्टोरेज स्पेस क्लिन करण्यासाठी, क्लीन अप स्पेस वर टॅप करा.
- त्यानंतर स्टोरेज मॅनेजर टूल्स वापरण्यास सक्षम असाल.
- येथे तुम्ही एका टॅपमध्ये सर्व मोठ्या फाईल्स पाहू आणि डिलीट करू शकता.
गुगल तुम्हाला लार्ज आयटम्सची संपूर्ण यादी दाखवते, त्यानंतर तुम्ही या लिस्टमधून लार्ज आयटम्स निवडू शकता आणि अनावश्यक फाइल डिलीट करू शकता.
याप्रमाणे देखील स्टोरेज क्लिन करू शकता…
- गुगल ड्राइव्हच्या मदतीने मॅन्युअली स्पेस व्यवस्थापित करू शकता.
- सर्वप्रथम गुगल ड्राइव्ह अॅप उघडा
- अनावश्यक फोटो आणि व्हिडिओ डिलीट करा.