Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गडचिरोलीत नरभक्षक वाघाची दहशत! १७ जणांचा मृत्यू, स्पेशल टीम घेतेय शोध!

नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
gadchiroli tiger (3)

मुक्तपीठ टीम

गडचिरोलीमध्ये वाघाच्या हल्ल्यात १७ माणसांनी तर ५००पेक्षा जास्त जनावरांनी जीव गमावला आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या वाघाच्या शोधासाठी स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स जंगलाच्या अनेक भागात शोध मोहीम राबवत आहेत.स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सकडून कॅमेरा ट्रॅप, स्थानिक लोकांच्या मदतीने वाघाला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सतरा जणांचा मृत्यू झाल्याने वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आता नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

gadchiroli tiger (4)

स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या प्रयत्नांमध्ये पावसाचाही अडथळा

  • सततचा पाऊस वाघाच्या शोधासाठीही समस्या निर्माण करत आहे.
  • सध्याच्या परिस्थितीत १७ लोकांचा बळी घेणारा वाघ शोधणे खूप कठीण आहे.
  • १५० हून अधिक कॅमेरे सेटअप करण्यात आले आहेत.
  • स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स सतत लक्षण ठेवत आहे.
  • दररोज जंगलात ४० किमी पेक्षा जास्त पायी प्रवास करुन शोध घेतला जात आहे.
  • गावकऱ्यांमध्ये नरभक्षक वाघामुळे प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

gadchiroli tiger (2)

गडचिरोली जिल्ह्यातील नरभक्षक वाघाला जेरबंद करा – एकनाथ शिंदे

गडचिरोली जिल्ह्यातील नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. शिंदे यांनी बैठकीत दिले. यासाठी ‘वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया’ सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेची मदत घेण्याचे निर्देश शिंदे यांनी प्रशासनाला दिले.

गडचिरोली जिल्ह्यातील नरभक्षक वाघाने केलेल्या हल्ल्यात १७ नागरिकांचा मृत्यू झाला असून ५०० हुन अधिक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. जिल्हा प्रशासन आणि वन विभागाकडून या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापही हा वाघ सापडला नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत.

‘वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया’ च्या चमूत पशु वैद्यकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, बायोलॉजिस्ट अशा तज्ञ व्यक्तींचा समावेश असून त्यांच्या माध्यमातून या वाघाचा शास्त्रोक्त पद्धतीने शोध घेऊन भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दीर्घकालीन उपाय करण्यात येणार असल्याचे  शिंदे यांनी स्पष्ट केले.

gadchiroli tiger (1)

या बैठकीला गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीना, गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य वन संरक्षक अधिकारी मानकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.


Tags: Eknath ShindeGadchiroliTigerएकनाथ शिंदेगडचिरोलीवाघ
Previous Post

“गडचिरोलीत नक्षलवादी कारवायांना जशास तसे उत्तर द्या”!

Next Post

“नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा”: छगन भुजबळ

Next Post
chhagan bhujbal

"नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा": छगन भुजबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!