Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

TIFRच्या कर्मचाऱ्यांना सल्ला: “सोशल मीडियावर सरकारविरोधी पोस्ट टाळा!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
TIFRच्या कर्मचाऱ्यांना सल्ला: “सोशल मीडियावर सरकारविरोधी पोस्ट टाळा!”

मुक्तपीठ टीम

देशातील प्रमुख संशोधन संस्थांमध्ये गणल्या जाणार्‍या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (TIFR) आपल्या कर्मचार्‍यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संस्थेच्या सुविधांचे सरकारविरोधी, फोटो आणि व्हिडिओ पोस्ट न करण्याचा सल्ला दिला आहे. टीआयएफआरने कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विशेषत: मुलांना अशा गोष्टी पोस्ट करण्यापासून रोखण्यास सांगितले आहे. मात्र, ही बातमी समोर आल्यावर टीआयएफआरने स्पष्ट केले की, हा आदेश नवीन नाही. सूचनांबाबतच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला गेला.

 

TIFR is policing its employees and their ‘family members’ from sharing ‘anti-government’ content in social media. This gag order is an attack by government on free speech and censoring of criticisms against the authoritarian regime that we have. @ndtv @thenewsminute @thewire_in pic.twitter.com/sb2FZpHmgP

— APPSC IIT Bombay (@AppscIITb) April 15, 2022

संस्थेने परिपत्रक जारी केले

  • टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने एक परिपत्रक जारी करून संस्थेच्या कर्मचाऱ्यांना विनंती केली आहे की, इन्स्टिट्यूट, फील्ड स्टेशन, निवासी मालमत्ता किंवा इतर कोणत्याही सरकारी मालमत्तेशी संबंधित कोणताही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणे टाळावे.
  • कर्मचार्‍यांना पुढे सूचित केले जाते की सोशल मीडियावर कोणतेही सरकार विरोधी साहित्य अपलोड करणे टाळावे.
  • तसेच कुटुंबातील सदस्यांनाही याची जाणीव करून द्यावी.

 

शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेला!

  • अणुऊर्जा विभाग (DAE) अंतर्गत स्वायत्त संस्था TIFR ने स्पष्ट केले की नोटिशीचा अर्थ असा होता की त्याचा “चुकीचा अर्थ लावला” गेला.
  • संस्था किंवा सरकारवर जाहीर टीका करण्यापूर्वी परवानगी घेणे नेहमीच बंधनकारक असते.
  • नोटीसमध्ये नमूद केलेले नियम आधीपासूनच अस्तित्वात आहेत आणि हे नियम सोशल मीडिया तसेच टेलिव्हिजन आणि प्रिंट मीडियासारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांना लागू होतात, हे स्पष्ट करण्यासाठी नवीन पत्र पाठवण्यात आले आहे.
  • टीआयएफआरने यासंदर्भात डीएईच्या नोटीसनंतर १३ एप्रिल रोजी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्याचे सांगितले.

 

त्याची गरज का होती?

  • १३ एप्रिल रोजी लिहिलेल्या पत्रात, TIFRचे रजिस्ट्रार विंग कमांडर जॉर्ज अँटनीने (निवृत्त), अणुऊर्जा विभागाद्वारे अधिसूचित केलेल्या टिप्पण्यांचा संदर्भ देत सांगितले की, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर DAE कार्यालये आणि सुविधांचे फोटो आणि व्हिडिओ पाहिले गेले आहेत.
  • त्यांनी सांगितले की काही असंतुष्ट कर्मचारी सोशल मीडियावर सरकारविरोधी गोष्टी शेअर करत आहेत.
  • याबाबत, टाटाच्या TIFR संस्था केंद्रे, फील्ड स्टेशन, निवासी वसाहती किंवा इतर कोणत्याही सरकारी मालमत्तेशी संबंधित कोणताही व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करू नये, असे निर्देशांमध्ये म्हटले आहे.
  • तसेच, कोणतेही वादग्रस्त विधान शेअर करू नका, कारण यामुळे सुरक्षा बिघडू शकते किंवा काही गंभीर माहिती चुकीच्या हातात जाऊ शकते.

Letter


Tags: social mediaTIFRटाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चसोशल मीडिया
Previous Post

भारतात मुस्लिम खरोखरच असुरक्षित आहेत का?

Next Post

राज्यात ५९ नवे रुग्ण, ७१ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Next Post
maharashtra corona report

राज्यात ५९ नवे रुग्ण, ७१ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!