मुक्तपीठ टीम
देशातल्या अव्वल कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक असलेल्या JSW ग्रुपने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नवी वर्षांच्या पार्श्वभूमीवर प्रोत्साहनपर (incentives) घोषणा केल्या आहेत. कंपनीने जानेवारीपासून इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना ३ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
We are proud to launch ‘JSW Green Gear’ an EV Policy for our employees across all our businesses. With this, we at the JSW Group lead the charge towards electric vehicle adoption. #iPledgeGreen@NITIAayog pic.twitter.com/8eCrI2hXO4
— JSW Group (@TheJSWGroup) December 27, 2021
JSW समूहाने जाहीर केलेली ही योजना त्यांच्या देशभरातल्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू असेल. कंपनीने सोमवारी परिपत्रक काढून ही घोषणा केली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात देश उत्तुंग भरारी घेत असताना इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जात आहे. पर्यावरणाला हानी पोहोचू नये, प्रदूषणमुक्त वातावरणाच्या दृष्टीने कंपनीने हे पाऊल टाकलं आहे.
कंपनीने जाहीर केल्यानुसार, दुचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी कंपनी इन्सेंटिव्ह देईल. यासोबतच कर्मचाऱ्यांसाठी सर्व JSW कार्यालये आणि प्लांट्सच्या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी मोफत डेडिकेटेड (EV Charging Station) चार्जिंग स्टेशन आणि पार्किंगची जागाही उपलब्ध करुन देणार आहे. कर्चमाऱ्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचा कंपनीचा मानस असल्याचं सांगण्यात आलं आहे.
जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्लासगो COP26 च्या बैठकीत घोषणा केली होती की, भारत २०७० पर्यंत शुद्ध-शून्य कार्बन उत्सर्जनपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. JSW समूहाचं याच दृष्टीने हे महत्वाचं पाऊल आहे. त्यासोबतच प्रदूषणमुक्त वातावरण निर्मितीला गती देण्यासाठी कंपनीचा हा पुढाकार आहे. आम्ही जबाबदारी पुढे पाऊलं टाकत राहू.
जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष आणि सीएचआरओ दिलीप पटनायक यांनी सांगितलं की, इलेक्ट्रिक वाहनं ही पारंपरिक आईसी इंजिन वाहनांच्या तुलनेत अधिक कुशल आहेत. जानेवारी २०२२ पासून आम्ही हे पाऊल टाकून आदर्श निर्माण करत आहोत. हा निर्णय फक्त पर्यावरणपूरक नाही तर यामुळे पैश्यांचीही बचत होणार आहे.
JSW ग्रुप स्टील, एनर्जी, इंफ्रास्ट्रक्चर, सिमेंट, पेंट्स, वेंचर कॅपिटल आणि स्पोर्ट्ससह विविध क्षेत्रात कार्यरत आहे. कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने हा निर्णय जाहीर करत २०३० पर्यंतचं आपलं उद्दिष्टही नश्चित केलं आहे. २०३० पर्यंत ४२ टक्के CO2 उत्सर्जन कमी करण्याचं त्यांचं ध्येय आहे.
पाहा व्हिडीओ: