Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘बिगबॉस’ विजेत्या विशाल निकमचं स्वागत, गाव जल्लोशानं दणाणलं!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
vishal nikam

मुक्तपीठ टीम

मराठी बिगबॉस सिझन थ्री चा विजेता ठरला देवेखिंडीचा विशाल निकम

‘बिगबॉस’चं तिसरं पर्व दिमाखात जिंकलं आणि विशाल निकमचं गाव जल्लोशानं दणाणलं! हिंदी बिगबॉस नंतर मराठी मध्ये बिगबॉसची लहर आली , आणि तिचे चक्क तीन सिझन प्रेक्षकांच्या उदंड प्रेमामुळे मोठया दिमाखात पार पडले. कालच तिसऱ्या सिझनचा ग्रँड फिनाले पार पडला आणि जेतेपदाची माळ विशाल निकमच्या गळ्यात पडली. जेतेपदाची ट्रॉफी आणि २० लाखाची रक्कम त्याला विनर म्हणून घोषित करण्यात आली आहे. विजयी झाल्यानंतर विशालने सरळ आपल्या गावाची वाट धरली आणि तो सरळ सांगली जिल्ह्यातील देवेखिंडी या गावी परतला. गावाने त्याच जल्लोषात स्वागत केले. लोकांच्या प्रेमामुळेच मी हा किताब जिंकू शकलो असे मत विशालने व्यक्त केलंय , तर लहानपणापासून सर्वाशी प्रेमाने , मिळून मिसळून वागण्याच्या त्याच्या स्वभावामुळे विशाल हे जेतेपद पटकवल्याची भावना त्याचा भाऊ डॉ. अभिजित निकम यांनी व्यक्त केली आहे. Bsc फिजिक्स घेऊन पदवीधर असलेला विशाल एनसीसी सुध्दा झालेला आहे.

पण नंतर तो मनोरंजन क्षेत्राकडे वळला , पण येथेही त्याने अत्यंत चमकदार कामगिरी केली आहे. यापूर्वी त्याने दक्खनचा राजा जोतिबा या मालिकेत प्रमुख भूमिका निभावली होती. त्यानंतर तो डायरेक्ट बिगबॉस च्या घरातच पहायला मिळाला. बिगबॉस च्या घरातील इतर तगड्या 5 कलावंतांचे आक्रमण थोपवून लावत शेवटी विशाल निकमने त्यावर आपले नाव कोरले आहे.

 

‘बिग बॉस’ विशाल निकम!

  • विशाल निकम हा सांगली जिल्ह्यातील देविखिंडी गावातील.
  • त्याचा जन्म १० फेब्रुवारी १९९४  रोजी तेथेच झाला.
  • विशालला अभिनयासोबतच फिटनेसचीदेखील आवड आहे.
  • विशालचं चित्रपटसृष्टीतील पदार्पण ‘मिथुन’ या सिनेमाद्वारे झाले.
  • हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता.
  • विशालच्या अभिनयाला दाद मिळू लागली ती छोट्या पडद्यावर.
  • ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेतील त्याची भूमिका प्रेक्षकांना भावली.
  • ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेमुळे तो घराघरात पोहचला.
  • ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेतही विशालला चांगल्या भूमिकेत संधी मिळाली.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: bigboss marathidevekhindiMahesh Manjrekarsanglivishal nikamदेवेखिंडीबिगबॉस मराठीमराठी बिगबॉस सिझन थ्रीमहेश मांजरेकरविशाल निकमसांगली
Previous Post

कोरोनाचा उद्रेक वाढला, नवे रुग्ण दोन हजारावर! १०९८ बरे! नवा ओमायक्रॉनबाधित नाही!

Next Post

कंपनी असावी अशी, ई-कार खरीदण्यासाठी कर्मचाऱ्यांना तीन लाख रुपये!

Next Post
jsw e car

कंपनी असावी अशी, ई-कार खरीदण्यासाठी कर्मचाऱ्यांना तीन लाख रुपये!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!