मुक्तपीठ टीम
गुणांपेक्षा रंग-रुप-शरीरावर माणसाला जोखायचं नसतं. पण अनेकदा घडतं तसंच. त्यातून मग तसे करणाऱ्यांचेच हसे होते. आणि कर्तृत्वाच्या बळावर ज्यांची अवहेलना केली जाते ते आभाळाएवढी उंची गाठतात. अॅड हरविंदर कौर उर्फ रुबी अशांपैकीच एक कर्तृत्वान.
हरविंदर कौर उर्फ रुबी भटिंडा जवळील रामा मंडीची रहिवासी आहे. हरविंदरची उंची ३ फूट ११ इंच आहे. रुबीला तिच्या छोट्या उंचीमुळे अनेक जणांचे बोलणे ऐकावे लागत असे. बालपणी तिला लोकांचे टोमणे तसेच खूप काही सहन करावे लागले. परंतु, आज तिची ही छोटी उंची लोकांमध्ये चांगल्या चर्चेचा विषय ठरली आहे. यातून लोकांना प्रेरणा देखील मिळतेय. कारण परंतु तिने हार मानली नाही. आज ती भारतातील सर्वात कमी उंची असलेली वकील आहे. ती पंजाबच्या जालंधर न्यायालयात वकिली करते.
अॅडव्होकेट हरविंदर कौरला लहानपणापासूनच एअर होस्टेस व्हायचे होते. पण उंचीमुळे तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. यावेळी, तिच्या कुटुंबीयांनीही डॉक्टरांना दाखवले. तिची वाढ कमी होती. ज्यासाठी, औषध देखील अनेक वेळा दिले गेले. मग हरविंदरने एअर होस्टेस होण्याचे स्वप्न सोडून दिले आणि तिने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली. तिने बारावीनंतर सोशल मीडियाचा आधार घेतला. तिने मोटिव्हेशनल व्हिडीओ पाहिले. यामुळे तिला धैर्य प्राप्त झाले. तेव्हा तिने असा दृढ निश्चय केला की, देवाने तिला जसे बनवले आहे ते स्वीकारायचे.
सोशल मीडियावरील लोकांनीही तिला खूप प्रेम दिले. तिने आपली कहाणी लोकांना सांगायला सुरुवात केली. ती सोशल मीडियावरून हे शिकली की, ज्यांना दुर्लक्ष करायचे आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे, जे चाहते आहेत त्यांचा आदर केला पाहिजे. अनेकजण तिची नेहमी चेष्टा करायचे, एक वेळ अशी होती जेव्हा ती लोकांपासून दूर होती. बर्याच वेळा तिच्या मनात आत्महत्या करणारे विचारही आले. पण तिने स्वत:ला सावरले.
कॉलेजला गेल्यानंतर तिचे आयुष्य खूप बदलले. ती हळू हळू सकारात्मक विचार करू लागली. त्यानंतर बारावीनंतर तिने कायद्याच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला. कायद्याचे अभ्यास पूर्ण केला. आता ती अॅडव्होकेट बनली आहे, पुढे तिचे न्यायाधीश होण्याचे स्वप्न आहे. ती एक मोटिव्हेशनल स्पीकर म्हणजेच प्रेरणादायी वक्तासुद्धा आहे.
पाहा व्हिडीओ: