Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काश्मीरमध्ये हिमवर्षावानं अवतरलं निसर्गाचं शुभ्रसौंदर्य… पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Snowfall

मुक्तपीठ टीम

काश्‍मीरमध्ये या वर्षातील पहिली हिमवृष्टी सुरू होऊन आता दहा दिवस उलटले. एवढ्या लवकर होणारी हिमवृष्टी आणि थंडी पाहता पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. हिमवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी आता काश्मीरकडे पर्यटकांची रिघ लागत आहे. सोनमर्ग आणि गुलमर्गसह काही लोकप्रिय पर्यटन स्थळांवर हिमवृष्टी आणि पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गुलमर्ग, सोनमर्ग, गुरेझ आणि कर्नाहसह काश्मीरमधील अनेक भागात हिमवृष्टीनं निसर्गाचं शुभ्रसौंदर्य अवतरलं आहे. अनेकांना हे थंडगार शुभ्रसौंदर्य भावतंही.

तसेच, श्रीनगर शहर आणि खोऱ्यातील इतर भागात मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे तापमानात काही अंशांनी घट झाली आहे. देशातील अनेक ठिकाणी दिवाळीच्या फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून वाचण्यासाठी येथे आलेल्या पर्यटकांच्या चेहऱ्यांवर सुरुवातीच्या हिमवृष्टीने नक्कीच आनंद फुललाय.

हिमवर्षाव पाहण्यासाठी पर्यटकांची वाढती क्रेझ!

  • हिमवृष्टीमुळे यावर्षी काश्मीरमधील हिवाळी पर्यटनात लवकर रस निर्माण झाला आहे.
  • हिवाळी पर्यटन टिकून राहण्यासाठी या हिवाळ्यात चांगली हिमवृष्टी होईल, अशी अपेक्षा असल्याचे पर्यटन व्यावसायित सांगतात.
  • भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार काश्मीर खोऱ्यात पुढील २ दिवस हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.
  • यावेळी, काही लोक घराबाहेर पडले आणि हिमवृष्टीचा आनंद घेतांना दिसले. तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
  • काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी सुरु आहे. उत्तर भारतात त्यामुळे शीतलहर आहे. शीत लहरीमुळे थंडी वाढली आहे. सगळीकडे बर्फच दिसत आहे.

काश्मीरमधील पाहण्यासारखी ठिकाणे –

काश्मीरमध्ये भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे असली, तरी श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगाम, पुलवामा, अरु व्हॅली, युसमर्ग व्हॅली, बेताब व्हॅली, दाचीगाम नॅशनल पार्क, चंदनवारी, पटनीटॉप, सनासर या ठिकाणांना प्रवाशांनी एकदा भेट दिलीच पाहिजे. या ठिकाणी हिमवृष्टीसोबतच सुंदर निसर्ग नक्कीच पाहायला मिळेल.


Tags: good newsKashmirmuktpeethSnowfallTouristsकाश्मीरघडलं-बिघडलंचांगली बातमीपर्यटकबर्फवृष्टीमुक्तपीठहिमवर्षाव
Previous Post

गुजरात पूल मृत्यूकांड: सर्वोच्च न्यायालयात १४ नोव्हेंबरला सुनावणी

Next Post

नेरळ – माथेरान टॉय ट्रेनची ९ दिवसांमध्ये ४ लाख ८१ रुपयांची कमाई! विस्टाडोमला नेरळ – माथेरान विभागातही प्रचंड प्रतिसाद!!

Next Post
Neral Matheran Toy Train

नेरळ - माथेरान टॉय ट्रेनची ९ दिवसांमध्ये ४ लाख ८१ रुपयांची कमाई! विस्टाडोमला नेरळ - माथेरान विभागातही प्रचंड प्रतिसाद!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!