मुक्तपीठ टीम
देशात सध्या पेगॅसस स्पायवेअरची जोरदार चर्चा होत आहे. पेगॅसस स्पायवेअरमुळे पुन्हा फोन हॅकिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अनेक प्रसिद्ध आणि महत्वाच्या व्यक्तींचे फोन हॅक केले जात आहे. मात्र, भविष्यात खासगी कारणांसाठी सर्वसामान्यांनाही टार्गेट केलं जाण्याची भीती नाकारता येत नाही. सीडीआरच्या माध्यमातून सध्या मर्यादित प्रमाणात तसं घडतंही आहे. काही स्पायवेअर हे मुख्यत्वे आर्थिक फसवणूक हा आहे. यामुळेच आम्ही तुम्हाला अशी काही टिप्स सांगणार आहोत,जेणेकरून तुम्हाला तुमचा फोन हॅक झाला आहे की नाही याची माहिती मिळवू शकते.
पाळत ठेवणारं पेगॅसस!
- पेगॅसस एक स्पायवेअर आहे.
- स्पायवेअर म्हणजे हेरगिरी किंवा पाळत ठेवण्यासाठी वापरलेले सॉफ्टवेअर.
- हे स्पायवेअर इस्त्रायली कंपनी एनएसओ ग्रुपने बनवले आहे.
- याद्वारे कोणताही फोन हॅक होऊ शकतो.
- पेगॅसस स्पायवेअर परवाना स्वरूपात विकले जाते.
- एका परवान्यासह अनेक स्मार्टफोनचा मागोवा घेतला जाऊ शकतो.
स्पायवेअरचा धोका कसा?
- स्पायवेअरने हॅकर्स तुमचे डिवाईस हॅक करु शकतात.
- त्याचा अर्थ डिव्हाईस तुमच्याकडे, पण त्याच्यावर तेही नियंत्रण ठेवू शकतात.
- एसएमएस, कॉन्टॅक डिटेल्स, कॉल हिस्ट्री, ई-मेल, सर्व रेकॉर्ड, मेसेजिंग अॅप्स आणि ब्राउझिंग यासह माहिती हॅक करू शकतात.
- याशिवाय हे आपल्या फोनच्या कॅमेर्यावर नियंत्रण ठेवून फोटो आणि कॉल रेकॉर्ड करू शकतात.
मोबाइल व्हेरिफिकेशन टूलकिट म्हणजे काय?
- एखाद्या डिव्हाइसमध्ये छेडछाड केली गेली आहे की नाही हे ओळखण्यासाठी आणि डिव्हाइसमध्ये पेगॅसस स्पायवेअर आहे की नाही हे शोधण्यासाठी अॅम्नेस्टीच्या संशोधकांनी मोबाइल व्हेरिफिकेशन टूलकिट डिझाइन केले आहे.
- संशोधकांचे म्हणणे आहे की, आयफोनमध्ये अँड्रॉइडपेक्षा स्पायवेअरची अधिक शक्यता असते.
- मोबाईल डिव्हाइसमध्ये हॅकिंगसाठी स्पायवेअर निर्माते वापरत असलेले काही घटक आहेत का ते शोधण्याची किंवा किमान तसा अंदाज बांधण्याची क्षमता या टूलमध्ये आहे.
एमव्हीटी आयफोन आणि अँड्रॉइड स्मार्टफोनवर कसे कार्य करते?
- एमव्हीटी आयफोन बॅकअप वाचण्यात सक्षम आहे.
- डिव्हाइसमध्ये छेडछाड झाल्याची चिन्हे तपासण्यासही सक्षम आहे.
- जसे की बॅकअपमध्ये पेगॅसस-संबंधित डोमेन आढळू शकतात, जेणेकरून यूजर्सना सावध होऊ शकतात की त्यांच्या डिव्हाइसमध्ये असे कोणतेही आयओसी अस्तित्वात आहे की नाही.
- जेव्हा अँड्रॉईड डिव्हाइसच्याबाबतीत हे टूल एसएमएसद्वारे पाठविलेल्या एनएसओ ग्रुपच्या डोमेनच्या कोणत्याही लिंकसाठी बॅकअपची तपासणी करते.
- आपल्या डिव्हाइसवरील सर्व अॅप्सची छेडछाड केली गेली आहे की नाही याची तपासणी करते.
एमव्हीटी उपलब्धता आणि किंमत
- अॅम्नेस्टी गिटहबवर एमव्हीटी विनामूल्य उपलब्ध करून करते.
- परंतु सध्या तो कमांड-लाइन इंटरफेस (सीएलआय) वर अवलंबून आहे.
- जे यूजर्स कमेंटमध्ये टाइप करू शकतात, ते आपल्या डिव्हाइसची तपासणीसाठी या फिचरचा वापर करू शकातात.
- संशोधकांनी एमव्हीटी कसे काम करते आणि ते कसे वापरावे याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याआधारे ते वापरणे शक्य असते.