मुक्तपीठ टीम
घडणाऱ्या रस्ते अपघातांचे प्रमाण शहरी भागात वाढताना आढळत आहे. हे रस्ते अपघात टाळण्यासाठी मुंबई मनपा काही योजना आखत आहे. त्यात एक महत्वाचा मुद्दा रस्त्यांवरील मार्किंग खुणांचा आहे. रात्रीच्या वेळी मार्किंग सहज दिसणे आवश्यक असते. त्यासाठी आता तेथे थर्माप्लास्टिकचा वापर केला जाणार आहे.
थर्मोप्लास्टिक मार्किंगचा फायदा
- मुंबईतील धुळीमुळे रंग लवकरच फिका पडू शकतो.
- कंत्राटदाराला पावसाळा वगळता दर महिन्याला मार्किंग मशीनने साफ करणे बंधनकारक असेल.
- आतापर्यंत मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांवरच वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी कलर मार्किंग केले जात आहे.
- तर अनेक रस्त्यांवर दुरुस्तीनंतर मार्किंग करण्यात आले आहे. आता जुन्या रस्त्यांवरही मार्किंग केले जाणार आहे.”
थर्माप्लास्टिकचे मार्किंग जास्त टिकते. तसेच ते रात्रीही दिसते. वाहतूक नियमांसाठीच्या मार्किंग दिसल्यास नियमांचे पालन करण्याचे प्रमाण वाढेल. त्यामुळे अपघात कमी होतील, असा दावा मुंबई मनपाने केला आहे. यासाठी मनपा कंत्राटदार नेमणार आहे. या योजनेत बहुतांश जुने रस्ते समाविष्ट केले जातील, ज्यांच्या नूतनीकरणासाठी मनपा ४५ कोटी ९० लाख रुपये खर्च करणार आहे.
रस्ते सुरक्षित बनवण्यासाठी महापालिकेची योजना
- जुन्या रस्त्यांवर वाहतुकीच्या नियमांसाठी केलेल्या दिशादर्शक खुणा दिसत नाहीत.
- मुंबईतील बहुतांश रस्त्यांवर स्पीड बॅरिअर्स लावण्यात आले आहेत, मात्र वाहनचालकांना वेगातील अडथळे दिसत नसल्याने रात्रीच्या वेळी अपघात होत आहेत.
- आता त्या ठिकाणी थर्माप्लास्टिक बसवण्यात येणार असून, ते रात्रीच्या वेळीही वाहनचालकांना सहज दिसेल.
- हा रंग वेगातील अडथळ्यांवर तसेच झेब्रा क्रॉसिंगवर वापरला जाईल.
- यासाठी पालिकेने कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
- या योजनेसाठी ४५ कोटी ९० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
पाहा व्हिडीओ: