Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

वैचारिक प्रगतिशील रंगभूमीचा वारसा चालवणारे ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’चे रंगकर्मी !

November 7, 2021
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
theater of relevance

मुक्तपीठ टीम 

मराठी रंगभूमी दिनानिमित्त

  • म – माणुसकी
  • रा – रंग
  • ठी- ठेव
माणुसकीच्या रंगाची
ठेव आहे मराठी !
मर्म रहस्यांनी नटलेली
ठेव आहे मराठी !
ममत्वच्या रसाने उमटलेली
संस्कृती आहे मराठी !
रंग म्हणजे विचार
विचारांचा इंद्रधनुष आहे रंगभूमी !
माणसांमध्ये रंगाची उधळण करते रंगभूमी
माणसाला माणूस म्हणून घडवते रंगभूमी !
– मंजुल भारद्वाज
theater of relevance
मराठी रंगभूमीच्या वाटचालीला १७८ वर्षे पूर्ण झाली आहेत, तरीही मराठी रंगभूमीच्या वैचारिक प्रगतीशीलतेची प्रतिबद्धता कुठे आहे ? असा प्रश्न विचारला जात आहे. जी रंगभूमी कधीकाळी आपल्या कलात्मक प्रगतीशिलतेतुन संपूर्ण देशाला सार्थक रंगकर्मासाठी प्रेरित करीत होती, त्याच रंगभूमीवर आज वैचारिक नाटक चालत नसल्याने  समाजमनाची मशागत करण्याची, त्यांच्यात मनुष्य असण्याची चेतना पेटवण्याची खरी भूमिका आता रंगकर्मीनी वटवण्याची गरज आहे.
theater of relevance
पशु पासून माणसाला वेगळं करते ती त्याची वैचारिक क्षमता. म्हणूनच “वैचारिक नाटक चालत नाही !” या भ्रमाला थिएटर ऑफ रेलेवन्स रंगकर्मी  गेले २९ वर्ष आपल्या विविध कलाकृतीतून खोडत आले आहेत. सातत्याने रंगभूमीवर विचारांचे नाटक प्रस्तुत करून प्रेक्षकांना माणूस म्हणून सृजित करणे आवश्यक आहे. इथे रंगचिंतक मंजुल भारद्वाज म्हणतात “विचार करण्याची क्षमता माणसांना जनावरांपासून वेगळी करते. जी लोकं हे म्हणतात की वैचारिक नाटक चालत नाही ते प्रेक्षकांना काय समजतात ?” दिवसभर कामाच्या रगाड्यातून बाहेर पडल्यावर परत वैचारिक नाटक बघण्यास कंटाळा येतो असे म्हणत प्रेक्षकांच्या वैचारिक चेतनेला नाकारणे समाजाला चेतनाहीन बनवणे आहे. प्रेक्षकांना विचारांनी मिळालेले आत्मिक समाधान त्यांच्या रोजच्या आयुष्यात एक नवचैतन्य भरते. आणि आयुष्य कंटाळवाणे न राहता जगण्याची नवदृष्टी प्रदान करते.  नाटक म्हणजे क्षणिक आनंद नाही तर आयुष्यभराची सात्विक ठेव आहे. माणसाला माणूस बनवते ती कला. कला जी प्रत्येक मानसिकता, सीमा तोडून मानवाला उंच भरारी देते. म्हणूनच मराठी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीचे वारसदार म्हणून आम्ही रंगभूमीला जिवंत ठेवण्यासाठी लॉकडाऊन च्या काळातही दोन नवीन नाटक मराठी रंगभूमीला दिले आहेत ते म्हणजे संविधानाचे मूल्य वाचवण्यासाठी धनंजय कुमार लिखित आणि मंजुल भारद्वाज अभिनित व दिग्दर्शित नाटक “सम्राट अशोक” आणि स्वतःतील सृजनकाराचा शोध घेण्यासाठी , सावित्रीच्या विचाराला घेऊन माणूस म्हणून अस्तित्व घडवणारे आणि  गाजवणारे मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक “लोक-शास्त्र सावित्री” !

रंगभूमीच्या पुनरुज्जीवनाचा ध्यास

कलेची नुमाईश – म्हणजे केवळ कलेचे प्रदर्शन करणे. रंगकर्माला केवळ प्रदर्शनाच्या साच्यात बसवल्याने, रंगकर्माची व्यापकता , त्याचा प्रभाव आणि प्रगतिशील प्रवाहाच्या कक्षा अरुंद होतात. समाजाच्या उन्नतीसाठी रंगभूमीला प्रस्थापित दुराग्रह मोडुन काढणे आवश्यक आहे आणि आम्ही मागील २९ वर्षांपासून सातत्याने रंगभूमीला पुनरुज्जीवन देत आहोत. या संकटकाळात जिथे अखंड समाज, अखंड विश्व थांबले होते तिथे “थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांताच्या रंगकर्मींनी  आपल्या रंगभूमीला श्वास दिला, प्राण दिला आहे !

theater of relevance

माणुसकीची दृष्टी जागविणारे नाटक हवे !

बाजारावादी मानसिकतेत अडकलेला समाज खरेदी आणि विक्रीच्या पलीकडे जात नाही तिथे आम्ही रंगकर्मी केवळ “नफा कमावण्यासाठी नाटक नव्हे तर माणुसकीची दृष्टी जागवण्यासाठी नाटक” या दृष्टी स्पष्टतेने रंगकर्म करत आहोत. नाटक म्हणजे चेतना , विवेक आणि विचार पेटवणे. रंगभूमीला घडवणारे आम्ही प्रतिबद्ध रंगकर्मी रंगभूमीला घडवण्यासाठी रंगकर्माच्या तत्वाला जगतो, आणि ते म्हणजे कलेच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून समाजाला एक रचनात्मक दिशा देत माणसाला माणूस म्हणून जगण्यास उत्प्रेरीत करणे. मूर्च्छित झालेल्या समाजाला विचारांनी जिवंत करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत.
theater of relevance

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताच्या नाट्य कलाकृती

मागील २९ वर्षांपासून ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ या नाटय़ सिद्धांताने सतत कोणत्याही देशीविदेशी अनुदानाशिवाय आपली जबाबदारी आणि कर्तव्ये निभावली आहेत. प्रेक्षकांच्या सहभागाच्या आधारावर मुंबईपासून मणिपूरपर्यंत हे ‘रंग आंदोलन’सुरू आहे. ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ने जीवनाला नाटकाशी जोडून मागील २९ वर्षांपासून जातीय मुद्दय़ावर
१) ‘दूर से किसी ने आवाज़ दी’,
बालमजुरीवर
२) ‘मेरा बचपन’
 कौटुंबिक हिंसेवर
३) ‘द्वंद्व’, 
४) ‘मैं औरत हूँ’, 
लिंगनिदान या विषयावर
५) नाटक ‘लाडली’,
जैविक आणि भौगोलिक विविधतेवर
६) ‘बी-७’ 
अशी नाटके रंगमंचावर आणली.

मानवता आणि नैसर्गिक साधनसामग्रीच्या खासगीकरणाविरोधात 

७) ‘ड्रॉप बाय ड्रॉप : वॉटर’,
मनुष्याला मनुष्य बनून राहण्यासाठी
८) ‘गर्भ’, 
शेतकऱयांची आत्महत्या आणि शेतीच्या होणाऱ्या विनाशावर
९) ‘किसानों का संघर्ष’,
कलाकारांना कठपुतली बनवणाऱ्या आर्थिक तंत्रापासून कलाकारांच्या उन्मुक्ततेसाठी नाटक
१०)  “अनहद नाद-अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स”
शोषण आणि दमनकारी पितृसत्तेच्या विरुद्ध न्याय, समता आणि समानतेची हुंकार देणारे
११)‘न्याय के भंवर में भंवरी’
समाजात राजनैतिक चेतना जागवण्यासाठी
१२) ‘राजगति ! 
भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्वांचे संरक्षण करण्याचा संकल्प करणारे धनंजय कुमार लिखित कालातीत नाटक
१३) ‘सम्राट अशोक’ !
सावित्रीच्या विचाराला वर्तमानाशी जोडणारे व प्रत्येकाला आपल्यात सावित्री शोधायला प्रेरित करणारे नाटक
१४) लोक-शास्त्र सावित्री
theater of relevance

“लोक-शास्त्र सावित्री”चा नवा प्रयोग डोंबिवली मध्ये 

आम्ही “थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांताचे रंगकर्मी मराठी रंगभूमीच्या वैचारिक प्रगतिशीलतेची प्रतिबद्धता साजरी करीत आहोत. रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित  “लोक-शास्त्र सावित्री” नाटकाच्या प्रस्तुतीने! मराठी रंगभूमी दिनानिमित्ताने युगपरिवर्तक नाटक “लोक-शास्त्र सावित्री”उद्या ७ नोव्हेंबर २०२१, रविवार रोजी, सकाळी ११.३० वाजता, सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली (पूर्व) येथे प्रस्तुत होणार !
या नाटकाला आपल्या वैचारिक प्रतिबद्धतेने साकारणारे कलाकार आहेत. अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, सुरेखा साळुंखे, साक्षी खामकर, तुषार म्हस्के, स्वाती वाघ, संध्या बाविसकर,नृपाली जोशी, रूपवर्धिनी सस्ते,मोरेश्वर माने.

वैचारिक नाटकांना पाठिंबा देणारा प्रेक्षक

“थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांताच्या रंगकर्मींची ताकद आहे कलात्मक “रंग संवाद”. नाटकाच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संवाद करत नाटकाच्या व्याप्तीची आणि रंगभूमीच्या स्पर्शाची जाणीव आम्ही करून देत आहोत. आज समाज संवादहीन झालेला आहे, वाद – विवादात अडकलेला आहे, तिथे आम्ही रंगकर्मी आपल्या कलात्मक पुढाकाराने प्रत्येक प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना या कलात्मक रंगआंदोलनात सामील करत आहोत, त्यांची सहभागीता सुनिश्चित करत त्यांना प्रक्रियेशी जोडत आहोत. आपल्या रंगभूमीसाठी वैचारिक नाटकांना पाठिंबा देणारे प्रेक्षक निर्माण करत आहोत !

Tags: manjul bhardwajMarathi Theater DaySavitribai Phule NatyagrihaTheater of Relevanceथिएटर ऑफ रेलेवन्समंजुल भारद्वाजमराठी रंगभूमी दिनसावित्रीबाई फुले नाट्यगृह
Previous Post

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत (निरी) मुंबई येथे नोकरीची संधी

Next Post

“साहित्य, संगीत व कला या विषयात ज्याला आवड नाही अशी व्यक्ती पशूतुल्यच” – राज्यपाल कोश्यारी

Next Post
Raj Bhavan’s first ‘Artists and Writers - in Residence’ programme concludes 3

"साहित्य, संगीत व कला या विषयात ज्याला आवड नाही अशी व्यक्ती पशूतुल्यच" - राज्यपाल कोश्यारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!